Join us

अमिताभ बच्चन यांच्या नव्हे तर रेखा या अभिनेत्याच्या नावाने भांगात भरायच्या कुंकू?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 9:00 PM

रेखा या सगळ्यांत पहिल्यांदा ऋषी कपूर आणि नीतू सिंग कपूर यांच्या लग्नात भांगेत कुंकू भरून आल्या होत्या.

ठळक मुद्देसंजय आणि रेखा दोघे जमीन आस्मान या चित्रपटात एकत्र काम करत होते. त्यावेळी त्यांच्या अफेअरची चर्चा मीडियात रंगली होती. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी लग्न केले असल्याचे म्हटले जात होते.

रेखा यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. रेखा यांनी अनेकवेळा भागांत कुंकू भरलेले असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी मीडियात चर्चा रंगली होती की, त्यांचे अभिनेता संजय दत्तसोबत लग्न झाले होते आणि त्याच्याच नावाने त्या कुंकू भरतात. एवढेच नव्हे तर या गोष्टीचा उल्लेख रेखाः दअन्टोल्ड स्टोरी या त्यांच्या पुस्तकात देखील करण्यात आला असल्याचे म्हटले जात होते. हे पुस्तक प्रकाशित व्हायच्याआधी या गोष्टीची चांगलीच चर्चा रंगली होती. अखेरीस या पुस्तकाच्या लेखकाला याविषयी स्पष्टीकरण द्यावे लागले होते.  

रेखाः दअन्टोल्ड स्टोरी हे पुस्तक यासीर उस्मान यांनी लिहिले होते. त्यांनीच हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले होते की, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. माझ्या पुस्तकात अशा कोणत्याच गोष्टीचा उल्लेख नाहीये. संजय आणि रेखा यांच्या अफेअरची चर्चा असल्याबद्दल केवळ मी लिहिले आहे. ते दोघे जमीन आस्मान या चित्रपटात एकत्र काम करत होते. त्यावेळी त्यांच्या अफेअरची चर्चा मीडियात रंगली होती. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी लग्न केले असल्याचे म्हटले जात होते. या सगळ्या बातम्या त्या काळात मीडियात चांगल्याच गाजल्या होत्या. अखेरीस संजय दत्तने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत या सगळ्या केवळ अफवा असल्याचे म्हटले होते. 

रेखा या सगळ्यांत पहिल्यांदा ऋषी कपूर आणि नीतू सिंग कपूर यांच्या लग्नात भांगेत कुंकू भरून आल्या होत्या. त्यांना पाहाताच लग्नात उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच धक्का बसला होता. या लग्नाला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन तसेच अमिताभ बच्चन यांचे आई-वडील देखील उपस्थित होते. रेखा यांनी भांगेत कुंकू भरल्याची चर्चा मीडियात देखील रंगली होती. अखेरीस रेखा यांनी या गोष्टीवर स्पष्टीकरत देताना सांगितले होते की, त्या चित्रपटाच्या चित्रीकरणावरून थेट लग्नाला आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी भांगेत कुंकू भरले होते. तसेच मंगळसूत्रदेखील घातलेले होते. 

टॅग्स :रेखासंजय दत्त