रेखा यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. बॉलिवूडमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्रींमध्ये रेखा यांची गणना केली जाते. पण असे असूनही गेल्या अनेक वर्षांपासून रेखा त्यांच्या अलिशान बंगल्यात एकट्याच राहात आहेत.
रेखा गेल्या अनेक वर्षांपासून एकट्या राहात असल्या तरी त्यांच्यासोबत नेहमीच एक सावलीप्रमाणे व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. ही व्यक्ती दुसरी कोणीही नसून त्यांची सेक्रेटरी फरजाना आहे. फरजाना गेल्या अनेक वर्षांपासून रेखा सोबत आहे. फरझाना आणि रेखा यांच्या ओळखीला 30 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पत्रकार मोहनदीप यांनी Eurekha या त्यांच्या पुस्तकात फरजानाविषयी अनेक खुलासे केले आहेत. या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे की, फरजाना ही नेहमीच मुलांसारखे कपडे घालते. ती केवळ एकच व्यक्ती आहे जी, रेखा यांच्या बेडरूममध्ये जाऊ शकते. रेखा यांना त्यांच्या बेडरूमममध्ये कोणीही आल्याचे आवडत नाही. केवळ फरजानाला त्यांच्या बेडरूममध्ये येण्याजाण्याची परवानगी आहे. फरजाना ही रेखा यांची केवळ सेक्रेटरीच नव्हे तर त्यांची सल्लागारदेखील आहे. त्या प्रत्येक गोष्ट फरजानाची ऐकतात. मोहनदीप एकदा रेखा यांच्या गाडीत बसले होते. त्या गाडीची खिडकी उघडी होती. पण प्रचंड ट्रॅफिक असल्याने रेखा यांना त्याचा त्रास व्हायला लागला होता. रेखा यांनी काही सांगायच्या आतच फरजानाने खिडकी बंद केली होती. त्यावरून रेखा यांची फरजाना किती काळजी घेतात हे मोहनदीप यांच्या लक्षात आले होते.
या पुस्तकात त्यांनी रेखा यांच्या सेक्शुअल लाइफविषयी देखील नमूद केले होते. त्यांनी या पुस्तकात म्हटले आहे की, रेखा आणि फरजाना यांच्यामध्ये सेक्शुअल रिलेशन आहेत. मोहनदीप यांनी या पुस्तकात असेही लिहीले आहे की, रेखाचे पती मुकेश अग्रवालने याच कारणामुळे आत्महत्या केली होती. या पुस्तकात रेखा आणि फरजाना यांच्याबद्दल अनेक गोष्टी लिहील्या असल्या तरी रेखा यांनी त्यावर कोणतेही कमेंट कधीच केली नाही.
रेखा फरजानाला त्यांच्या सोल सिस्टर असल्याचे सांगतात. फरजाना सुरुवातीला रेखा यांच्या हेअर स्टायलिस्ट होत्या. पण आता गेल्या कित्येक वर्षांपासून फरजाना रेखा यांच्या सेक्रेटरी आहेत. फरजाना ही आज रेखा यांच्या सर्वात जवळची व्यक्ती म्हणून ओळखली जाते. मोहनदीप यांचे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते चांगलेच वादग्रस्त ठरले होते. रेखाच्या फॅन्सना तर यामुळे चांगलाच धक्का बसला होता.