Join us

पुल्कित - यामी यांच्यातील जवळीक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:06 AM

'सनम रे' अँक्टर्स पुल्कित सम्राट आणि यामी गौतम हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. पुल्कित-श्‍वेता रोहिरा हे घटस्फोट घेणार ...

'सनम रे' अँक्टर्स पुल्कित सम्राट आणि यामी गौतम हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. पुल्कित-श्‍वेता रोहिरा हे घटस्फोट घेणार असून त्यात या रिलेशनशिपमुळे त्याचा आणखी भडका उडण्याची शक्यता आहे. श्‍वेताच काही महिन्यांपूर्वी म्हणाली होती की, 'आता ती आणि पुल्कित एकत्र राहत नाहीत. आमच्यात आता कोणताही संबंध नाही. त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे याबद्दल मला काहीच माहित नाही. पण आता ती हे बोलली आहे ते अमान्य करते. ती आता म्हणते की, पुल्कितला ती चांगल्या पद्धतीने ओळखते. यामी ही त्याच्या आयुष्यात आलेली सर्वांत शेवटची व्यक्ती आहे.' नंतर पुढे ती म्हणते,' आठ वर्षांपूर्वी या दोघांनी एकत्र म्युजिक व्हिडिओ केला होता. तो तिला थोडंही बोलत नव्हता. पण, यामीची नेहमीच त्याच्यावर नजर होती.'