Join us

Relationship : ​‘या’ गोष्टींचे पालन केल्यास तुटणार नाही पती-पत्नीचे नाते !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2017 7:52 AM

-रवींद्र मोरे म्हणतात की, पती-पत्नीचे नाते एकदा बांधले की, ते सात जन्मापर्यंत टिकते. मात्र सद्यस्थिती पाहता हे पवित्र नाते ...

-रवींद्र मोरे म्हणतात की, पती-पत्नीचे नाते एकदा बांधले की, ते सात जन्मापर्यंत टिकते. मात्र सद्यस्थिती पाहता हे पवित्र नाते कोणत्या कारणाने कधी तुटेल याची शाश्वती देताच येणार नाही. बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोडा यांचे पती-पत्नीचे नाते तब्बल २३ वर्षांनी तुटले. त्यांना १४ वर्षाचा मुलगाही होता. बॉलिवूडमध्ये असे अनेक उदाहरणे सांगता येतील की, काही वर्ष पती-पत्नी म्हणून सोबत राहिलेले कपल्स आता घटस्पोट घेऊन एकमेकांपासून लांब राहत आहेत. एवढे वर्ष सोबत असूनही हे नाते संपुष्टात येत असेल तर याला काहीतरी कारण असावे. तज्ज्ञांच्या मते नाते जपताना आणि ते टिकवून ठेवण्यासाठी दोघांनी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. जाणून घेऊया कोणत्या गोष्टींचे पालन करावे. * जर आपल्या दोघांची झोपण्याची वेळ वेगवेगळी असेल तर ही सवय आताच बदला. नात्यात पे्रमाचा ओलावा कायम टिकण्यासाठी आपण दोघे सोबतच बेडरु ममध्ये झोपायला जाणे आवश्यक आहे. एक जण लवकर झोपून जाईल आणि दुसरा पार्टनर कामच करीत असेल, असे मुळीच व्हायला नको. * दुसरी गोष्ट म्हणजे झोपण्याअगोदर आपल्या हातात मोबाइल अजिबात नसावा. शिवाय बेडरुममध्ये टीव्हीदेखील नसावा. बेडरुममध्ये रोमॅँटिक वातावरण निर्माण करण्यासाठी म्यूझिक प्लेअर ठेवू शकता. धिम्या आवाजाच्या संगिताचा रात्रभर आनंद घेऊ शकता. झोपण्यापुर्वीची वेळ लॅपटॉप, मोबाइल आणि टीव्हीवर घालविण्यापेक्षा पार्टनरसोबत घालविल्यास दोघांमधील जवळीकता अधिक साधली जाईल. Also Read : Relationship : कामाच्या तणावातही असे जपा नातेसंबंध !                   * गप्पा मारताना त्यात कामातील अडचणी, आॅफिसातील पॉलिटिक्स, नातेवाईकांविषयी वाईट चर्चा आदी करण्यापेक्षा यावेळी आपण दोघांनी एकमेकांविषयी बोलणे अधिक फायदेशीर ठरते. एकमेकांशी प्रेमभावनेने बोलल्यास नात्यात नेहमी गोडवा आणि प्रेम टिकून राहते.    * आपल्या पार्टनरची आपण नेहमी प्रशंसा करावी. लहान-लहान प्रसंगी केलेली प्रशंसा आपले नाते टिकविण्याठी खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. विशेष म्हणजे आपल्यासाठी आपला पार्टनर किती स्पेशल आहे, याची जाणिव आपण त्याला रोजच करु न द्यावी. * पती-पत्नीचे नाते चिरकाल टिकण्यासाठी वरील महत्त्वाच्या गोष्टींबरोबरच प्रत्येक गोष्टीत सकारात्मक विचारसरणीदेखील असावी. यामुळे आपले दोघांचे संबंध अजून मजबूत होण्यास मदत होईल.