रिलीजआधी जाणून घ्या,‘मुन्ना मायकल’ची स्टोरी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2017 10:39 AM
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याचा ‘मुन्ना मायकल’ हा चित्रपट येत्या रविवारी प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. टायगरशिवाय निधी अग्रवाल आणि ...
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याचा ‘मुन्ना मायकल’ हा चित्रपट येत्या रविवारी प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. टायगरशिवाय निधी अग्रवाल आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यात मुख्य भूमिकेत आहेत. खरे तर ‘मुन्ना मायकल’च्या ट्रेलरवरून हा चित्रपट डान्सवर आधारित चित्रपट आहे, हे सगळ्यांना कळून चुकले. टायगरचा डान्स शिवाय धम्माल अॅक्शन पाहायला सगळेच उत्सुक आहेत. तुमची हीच एक्साइटमेंट काही प्रमाणात कमी करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत, चित्रपटाची संपूर्ण कथा. होय, रिलीजआधी ‘मुन्ना मायकल’ची संपूर्ण कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही कहाणी आहे, मुन्ना नावाच्या एका मुलाची. चाळीत वाढलेला मुन्ना मायकल जॅक्सनचा मोठा फॅन असतो. इतका की, त्या्च्या चाळीतल्या घरात सगळीकडे मायकलचे पोस्टर्स लागलेले असतात. आता मायकलचा इतका मोठा फॅन म्हटल्यावर तो डान्सचा शौकीन तर असणारच ना. उठता-बसता त्याला आठवतो तो केवळ डान्स...डान्स आणि डान्स...वयात येईपर्यंत डान्स हेच मुन्नाचे पॅशन बनते. आपल्या डान्समधून मायकल जॅक्सन अमर आहे, हेच त्याला सिद्ध करायचे असते. हेच त्याचे स्वप्न ठरते. ड्रीम्स का तो पता नही...बस यही साबित करना चाहता हंू की मायकल हमेशा जिंदा रहेंगे, असा डायलॉग मुन्ना ट्रेलरमध्ये म्हणताना दिसतोय. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी एका गँगस्टरच्या भूमिकेत आहे. त्याला डान्सचा शौकचा आहे. पण डान्सचा आणि त्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. मग तो मुन्नाजवळ डान्स शिकायला जातो. मुन्ना त्याला डान्स शिकवतो आणि डान्ससाठी पूर्णपणे तयार करतो. डान्सिंग स्टारची ट्रॉफी जिंकणे, हे मग या गँगस्टरचे स्वप्न बनते. नवाजुद्दीनला डान्स शिकवता शिकवता दोघांमध्येही चांगली मैत्री होते. पण डान्सिंग स्टारची ट्राफी जिंकण्याचे भूत नवाजवर असे काही मानगुटीवर बसते की, नवाज व टायगर दोघांमध्ये दरी निर्माण होते.याचदरम्यान डॉलीची भूमिका साकारणा-या निधी अग्रवालची एन्ट्री होते. तिचे स्वप्नही नवाज व टायगरपेक्षा वेगळे नसते. यात निधी टायगरसोबत फ्लर्टिंग व रोमान्स करताना दिसणार आहे. आता डान्सिंग स्टारची ट्रॉफी कुणाला मिळते आणि कथा कुठल्या वळणावर जाते, हे मात्र तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच कळणार आहे.