'बाहुबली 2' च्या रिलीजनंतर दोन वर्षांनी प्रभाससाहोसोबत सिल्वर स्क्रिनवर परततो आहे. साहो नॉर्थ इंडियामध्ये 4500 स्क्रिनवर रिलीज करण्यात येणार आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार रिलीज आधीच साहोने बाहुबली 2 चे रेकॉर्ड तोडला आहे. साहो तामिळनाडूमध्ये जवळपास 550 स्क्रिनवर रिलीज होतो आहे. या आधी 'बाहुबली 2' 525 स्क्रिनवर रिलीज करण्यात आला होता.
मेकर्स साहोला हिट करण्यासाठी कोणतीच कसर सोडू इच्छित नाही. साहोने रिलीज आधीच 320 कोटींची कमाई केली आहे. रिपोर्टनुसार मेकर्सनी साहोचे थियेट्रिकल राईट्स 320 कोटींना विकले आहेत. मेकर्सनी साहोचे सेटलाईट राईट्स विकलेले नाहीत. साहोकडे 2019 मधला सर्वात बिग बजेट सिनेमा म्हणून पाहिलं जातंय.
सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष दिले आहे. प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.साहो हा सिनेमा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे.