महाशिवरात्रीनिमित्त देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या लेखणीतून साकार झालेले आणि शंकर महादेवन (Shankar Mahadevan), अमृता फडणवीस (Amruta Phadnavis) यांनी स्वरसाज दिलेले ‘देवाधी देव’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. राज्याचे चाण्यक म्हणून ख्याती असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या व्यक्तीमत्वाचा एक नवा आगळा वेगळा आयाम समोर आला आहे. ऐरवी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या गाण्यांसाठी चर्चेत असतात. मात्र ऐरवी महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील ‘डिरेक्टर’ असलेले देवेंद्र फडणवीस आता गीतकार झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया ते राजकारण यावर चांगलीच चर्चा रंगली आहे. महाकाल देवाधीदेव शंकर म्हणजे हिंदूच्या आस्थेचा व श्रद्धेचा विषय आहे. महाशिवरात्रीला हिंदू सणांमधे मोठे महत्व आहे. ‘देवाधी देव’ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले महादेवावर गाणे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आले आहे. याची माहिती स्वतः ट्विट करुन देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलेला महामृत्युंजय मंत्रही दाखवण्यात आला आहे. हा ‘शिव ट्रॅक’ महाशिवरात्री उत्सवासाठी एक उत्तम गाणे आहे.