माधुरीसारखी दिसते म्हणून बसला फटका अखेरीस सोडावे लागले करिअर, आता दिसते अशी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 06:00 AM2019-11-27T06:00:00+5:302019-11-27T06:00:00+5:30
भावानं केलेल्या मार्गदर्शनामुळे तिने आपला पहिला पोर्टफोलिओ बनवला. यानंतर निक्कीचं नशीब जणू काही पालटलं. तिचा पोर्टफोलिओ पाहून तिला जाहिरातीच्या विविध ऑफर्स येऊ लागल्या.
नव्वदच्या दशकात रुपेरी पडद्यावर एक अभिनेत्री झळकली होती. त्या अभिनेत्रीचं नाव होतं निक्की अनेजा. या अभिनेत्रीबाबत तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. मात्र हिची खास ओळख म्हणजे ती धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिची डुप्लिकेट होती. मिस्टर आजाद या सिनेमातून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात करणा-या निक्कीला बॉलीवुडला रामराम का करावा लागला याचा खुलासा खुद्द तिनेच केला होता. भावानं केलेल्या मार्गदर्शनामुळे तिने आपला पहिला पोर्टफोलिओ बनवला. यानंतर निक्कीचं नशीब जणू काही पालटलं. तिचा पोर्टफोलिओ पाहून तिला जाहिरातीच्या विविध ऑफर्स येऊ लागल्या. तिची पहिली कमाई 8 हजार रुपये होती.
जाहिरात, मॉडेलिंगबद्दल निक्कीच्या मनात विशेष आवड निर्माण झाली. मात्र यांत करियर करण्याच्या इच्छेला तिलांजली देत निक्की पुन्हा वडिलांकडे आली. वडिलांकडे आग्रह करुन तिने सिनेमात काम करण्याची परवानगी मिळवली. मिस्टर आजाद या पहिल्याच सिनेमातील तिच्या कामाचं कौतुकही झालं. मात्र त्याचेवळी ती माधुरीची डुप्लिकेट असल्याचा शिक्काही तिच्यावर बसला.
पहिल्या सिनेमानंतर निक्कीकडे ब-याच ऑफर्स आल्या होत्या. मात्र जीवनात घडलेल्या एका घटनेमुळे ती चांगलीच हादरली. तिच्या वडिलांचं अचानक निधन झालं आणि तिनं सिनेमात काम करण्यास नकार दिला. सिनेमांसाठी घेतलेले पैसे तिने परत केले. वडिलांच्या अकाली निधनामुळे निक्की अशी काही कोसळली की तिनं या इंडस्ट्रीलाच रामराम ठोकला. ब-याच वर्षानंतर निक्की पुन्हा एकदा अभिनयाकडे वळली. अभिनेता संजय कपूरसह 'इश्क गुनाह' या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली आहे.