सेलिब्रिटींचे डुप्लिकेटची चर्चा होते. पण ती तेवढ्यापुरतीच. काही जण नकला करून याचा फायदा करून घेतात, तर काही थोडेफार नशीबवान लोक डुप्लिकेट म्हणून चार दोन सिनेमे करतात. असे अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतील. स्नेहा उल्लाल ( Sneha Ullal) त्यापैकीच एक. ऐश्वर्याची डुप्लिकेट म्हणून स्रेहा ओळखली जाते. 2005 मध्ये ती याच कारणाने चर्चेत आली होती. याच जोरावर सलमानने (Salman Khan) तिला ‘लकी : नो टाईम फॉर लव्ह’ ( Lucky: No Time For Love) हा सिनेमात दिला होता. केवळ आणि केवळ ऐश्वर्यासारखी दिसते म्हणून सलमानने म्हणे स्रेहाला लॉन्च केले होते. ही स्रेहा आता काय करतेय, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
स्रेहाचा जन्म एका तेलगू कुटुंबात झाला. आईसोबत मुंबईला शिफ्ट झाल्यावर तिचे हायस्कूल व कॉलेजचे शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले. कॉलेजमध्ये असतानाच तिला सलमानने लॉन्च केले. पाठोपाठ सलमानचा भाऊ सोहेल खानसोबत ‘आर्यन’ या सिनेमात ती दिसली. पण तेवढ्यापुरतीच. ऐश्वर्या सारखा चेहरा असूनही तिचे हे दोन्ही सिनेमे फार काही कमाल दाखवू शकले नाहीत. अभिनय जेमतेम म्हटल्यावर आपली डाळ फार काळ शिजणार नाही, हे स्रेहाच्या वेळीच लक्षात आले आणि तिने बॉलिवूडमधून काही काळ बे्रक घेतला.
यानंतर तिने तेलगू सिनेमांकडे मोर्चा वळवला. 2008 साली ‘उल्लासाम्गा उत्साहम्गा’ या तेलगू सिनेमातून तिने कमबॅक केले. हा सिनेमा तुफान चालला. पुढे ‘नेनू मीकू तेलगुसा’ या दुसरा तेलगू सिनेमाही ब-यापैकी चालला. 2010 मध्ये स्रेहाने बॉलिवूडमध्ये रि-एन्ट्री करण्याचा प्रयत्न केला खरा. पण हा सिनेमा कधी आला अन् कधी गेला, हेही कोणाला कळले नाही. यानंतर काय तर स्रेहा अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. चार वर्षे ती कोणालाही ती दिसली नाही.
होय, या चार वर्षात ती आजारपणाने बेजार होती. स्नेहाला एका आजाराने ग्रासले होते. यात ती न अधिक चालू शकत होती, ना अधिक वेळ उभी राहू शकत होती. स्नेहा ऑटोइम्यून डिसऑर्डरने पीडित होती. हा एक रक्तासंदर्भातील आजार आहे. यामुळे स्नेहा प्रचंड अशक्त झाली होती. इतकी की, खूप वेळ आपल्या पायांवर उभीही राहू शकत नव्हती. त्याचमुळे ती चित्रपटांपासून दूर राहिली. स्नेहा शेवटची 2015 मध्ये बेजुबाँ या चित्रपटात झळकली होती. स्नेहा सध्या चित्रपटात काम करत नसली तरी ती काही ब्रँडसाठी जाहिरात करते. यासाठी तिला चांगले पैसे मिळतात.