Join us

रेणुका शहाणेच्या स्माईलवर नेटकरी फिदा, विमातळावर दोन्ही मुलांसोबत दिसली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:36 IST

रेणुका शहाणेंचा सुंदर पेहराव आणि मुलांचा साधेपणा पाहून नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत.

'हम आप है कौन' फेम अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) आपल्या गोड हास्याने आजही सर्वांना घायाळ करते. १९९४ साली आलेल्या या सिनेमात रेणुका शहाणेने माधुरीच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती. रेणुका शहाणे मराठी अभिनेत्री, दिग्दर्शकही आहेत. नुकत्याच त्या मुंबई विमातळावर दिसल्या. त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलंही होती. रेणुका शहाणेंचा सुंदर पेहराव आणि मुलांचा साधेपणा पाहून नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत.

रेणुका शहाणे कधीही दिसल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच दिलखुलास हास्य असतं. सर्वांशी हसत खेळत बोलतानाही दिसतात. नुकत्याच त्या मुंबई विमानतळावर आल्या होत्या. त्यांनी लाल रंगाची बनारसी साडी नेसली ज्यात त्या खूप सुंदर आणि साध्या दिसत होत्या. अगदी भारतीय परंपरेनुसार त्यांनी पेहराव केला होता. तर त्यांची दोन मुलंही उंच, स्मार्ट दिसत होती. तिघांनी पापाराझींसमोर हसतच पोज दिली. यावेळी दोन्ही मुलं आईच्या दोन्ही बाजूला उभी होती. दोघांनी कुर्ता पायजमा घातला होता. त्यांचा साधेपणा पाहून सर्वच त्यांचं कौतुक करत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

'स्माईल तर आजही तशीच आहे', 'आजच्या जमान्यातही संस्कार ठळक दिसत आहेत','मुलांना चांगलं वाढवलंय' अशा नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

रेणुका शहाणे यांनी २००१ साली अभिनेते आशुतोष राणा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. हे त्यांचं दुसरं लग्न आहे. त्यांना शौर्यमान राणा आणि सत्येंद्र राणा ही दोन मुलं आहेत. आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे इंडस्ट्रीतलं गोड कपल आहे. 

टॅग्स :रेणुका शहाणेबॉलिवूडमराठी अभिनेतासोशल मीडिया