रेणुका शहाणे म्हणते, ‘शहाणे’ बना; सावध राहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 11:13 AM2019-04-08T11:13:32+5:302019-04-08T11:14:18+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला काही दिवस उरले असताना बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीही सक्रीय झाले आहेत. अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या राजकीय भूमिकेतून सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे यापैकीच एक.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला काही दिवस उरले असताना बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीही सक्रीय झाले आहेत. अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या राजकीय भूमिकेतून सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे यापैकीच एक. निवडणुकीदरम्यान ‘शहाणे’ बना आणि डोळसपणे मतदान करा, असे आवाहन रेणुकाने केले आहे.
‘निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांचे उमेदवार अचानक ‘सामान्य’ नागरिकांसारखे बस, ट्रेन, मेट्रोमधून प्रवास करतील. गरीबाच्या झोपडीत जावून भोजन करतील. शेतकऱ्यांसोबत राबताना दिसतील. नागरीक या नात्याने या उमेदवारांचे गत पाच वर्षांचे वर्तन आणि काम आपण बघायला हवे. आपले प्रत्येक मत मोलाचे आहे. सावध राहा,’ असे ट्वीट रेणुका शहाणेने केले आहे.
चुनावों के मौसम में विविध राष्ट्रीय दलों के उम्मीदवार अचानक "आम" आदमी जैसा बस, ट्रेन या मेट्रो का सफर करेंगे, ग़रीबों के घरों में भोजन करेंगे, किसानों के साथ खेती करेंगे वगैरह वगैरह। हम नागरिकों को चाहिये उनके पिछले ५ वर्ष का बर्ताव व काम देखें।अपना हर मत क़ीमती है, सतर्क रहें 🙏🏽
— Renuka Shahane (@renukash) April 7, 2019
रेणुकाचे हे ट्वीट वाचून अनेकांनी तिला पाठींबा दिला आहे. याऊलट काहींनी तिला ट्रोल केले आहे. रेणुकाने या ट्वीटमधून हेमा मालिनी आणि संबित पात्रा सारख्या राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे, असे अनेकांचे मत आहे. अलीकडे हेमा मालिनी शेतकऱ्यांसोबत ट्रॅक्टर चालवताना व त्यांच्यासोबत राबताना दिसल्या होत्या. तर संबित पात्रा गरीबांच्या घरी जेवताना दिसले होते. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हो न। अगदी बरोबर। गंगा आरती तर विपक्ष आणि सत्ताधारी, दोन्ही पक्षांतील लोग जोरजोरात करतात आणि नर्मदा परिक्रमा आणि कुंभ स्नान पण! परिक्षेत अभ्यास न केलेली मुलं नाही का परिक्षेच्या आधी सगळ्या देवी-देवांचे दर्शन करत असतात? तसेच आपले उमेदवार ही नाही का? https://t.co/8IBkEPi7Eu
— Renuka Shahane (@renukash) April 7, 2019
Agar aap bhi chowkidaar hain toh koi mahila surakshit nahi #BesharmiKiHadd@IndiaMeToohttps://t.co/CQyIBm0waL
— Renuka Shahane (@renukash) March 16, 2019
काही दिवसांपूर्वी रेणुकाने भाजपा नेते एम. जे. अकबर यांना लक्ष्य केले होते. अलीकडे काँग्रेसने सोशल मीडियावर ‘चौकीदार चोर है’ अशी मोहिम उघडली होती. याच मोहिमेला प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडून ‘मैं भी चौकीदार’ या कॅम्पेनची सुरुवात करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे ‘चौकीदार नरेंद्र मोदी’असे नवीन नाव ठेवण्यात आले होते. भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी, मोठ्या नेत्यांनी तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी देखील ‘चौकीदार अमित शाह’ असे नाव ठेवले होते. भाजपाच्या या मोहिमेला माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांनी देखील पाठिंबा दिला होता. यानंतर रेणुका शहाणे यांनी यावरून एम.जे.अकबर यांच्यावर टीका केली होती. ‘ तुम्ही चौकीदार असाल तर महिला असुरक्षितच’ असा टोला रेणुका तिने लगावला होता.