Republic Day: आज संपू्र्ण देश ७६ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. हिंदी सिनेमाच्या इतिहासात आजवर अनेक देशभक्तीपर सिनेमे आले आहेत. नुकताच अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' सिनेमाही प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रिलीज झाला. सध्या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ओटीटीवरही अनेक देशभक्तीपर सिनेमे आहेत जे प्रत्येक देशवासीयाने आज २६ जानेवारी दिवशी बघायला हवे.
बॉर्डर
१९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धात लाँगेवाला मध्ये झालेल्या लढाईवर आधारित बॉर्डर सिनेमा. जेपी दत्ता दिग्दर्शित या सिनेमात सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना असे एकापेक्षा एक कलाकार होते. यातील गाणीही डोळ्यात पाणी आणणारी आहेत. अॅमेझॉन प्राईमवर सिनेमा उपलब्ध आहे.
रंग दे बसंती
रंग दे बसंती हा सिनेमा मित्रांची कहाणी आहे. आपल्या मित्राला आलेल्या वीर मरणानंतर त्याचं नाव घेऊन राजकारणी चुकीच्या गोष्टी बोलतात. तेव्हा ते सर्व मित्र राजकारण आणि भ्रष्ट्राचाराच्या विरोधात आवाज उठवतात. आपल्या देशभक्तीचा पुरावा देतात. यात त्यांनाही मरण येतं. राकेश ओमप्रकाश दिग्दर्शित हा सिनेमा कधीही पाहिला तरी भावुक करणारा आहे. नेटफ्लिक्सवर सिनेमा पाहता येईल.
राजी
आलिया भट्टचा 'राजी' तर मस्ट वॉच आहे. एका तरुण मुलीला तिचे वडील पाकिस्तानमध्ये जासूस बनबन पाठवतात. तिचं तेथील सैन्य अधिकाऱ्याच्या मुलाशीच लग्न लावतात. आलिया भट्टने त्या तरुणीची भूमिका उत्तम साकारली आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित हा सिनेमा पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल हे नक्की. अॅमेझॉन प्राईमवर सिनेमा आहे.
उरी: द सर्जिकल स्ट्राईक
उरी अॅटॅकवर आधारित हा सिनेमा २०१९ मध्ये रिलीज झाला होता. उरी मध्ये भारतीय सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचं त्यांनी कसं प्रत्युत्तर दिलं यावर सिनेमा आधारित आहे. विकी कौशलने ही भूमिका अतिशय उत्तमरित्या निभावली आहे. झी5 वर सिनेमा पाहता येईल.