Join us  

ट्रॅफिक मोकळे करण्यासाठी केली पंच मारण्याची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2016 3:26 PM

सिनेकलावंत खºया आयुष्यात सामान्यांसारखेच असतात. मात्र, सिनेमाने दिलेली ‘अँग्री यंग मॅन’ची इमेज सतत सोबत असायची. तो एकटाच खलनायकाचा सामना ...

सिनेकलावंत खºया आयुष्यात सामान्यांसारखेच असतात. मात्र, सिनेमाने दिलेली ‘अँग्री यंग मॅन’ची इमेज सतत सोबत असायची. तो एकटाच खलनायकाचा सामना करतो व गुंडांची चांगलीच धुलाई करतो. एकदा ट्रॅफिक जाममध्ये अडकल्यावर एका व्यक्तीने मला ओळखले, तो म्हणाला, ‘तुम्ही अमिताभ बच्चन आहात ना, तुम्ही गाडीतून बाहेर उतरून दोन तीन लोकांना पंच का मारत नाही. त्यामुछे हे ट्रॅफिक निश्चितपणे मोकळे होईल’ असे सांगत अमिताभ बच्चन यांनी आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांच्यासोबत ‘बॉलिवूडचे शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा देखील हजर होते. एका वाहिनीवर प्रसारित होऊ घातलेल्या ‘यारो की बारात’ या कार्यक्रमात त्यांनी आपला जिगरी यार शत्रुघ्न सिन्हासोबत आपल्या आयुष्याची व मित्रांची रहस्ये उलगडली. सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असलेलाअभिनेता रितेश देशमुख व दिग्दर्शक साजीद खान यांनी त्यांना बोलते केले. अमिताभ बच्चन म्हणाले, खºया आयुष्यात आम्ही लोकांना अजिबात मारू शकत नाही. यावर शत्रुघ्न सिन्हा दुजोरा देत म्हणाले, मीडियाने त्यांना सुपरस्टार व मेगास्टारची भूषणे लावली आहेत. खºया आयुष्यात आम्ही दोघेही खूपच साधे आहोत. ‘चित्रपटात आम्हाला लोकांनी इतरांना मारताना पाहिले आहे पण त्याचा अर्थ हा नाही की मी सेटवरही तेच करेल. आम्ही आमच्या आॅनस्क्रीन ईमेजच्या अगदी विरुद्ध असतो. आम्हालाही मस्ती करायला आणि हसत खेळत जगायला आवडते. आम्हा दोघांची मैत्री आमच्या स्ट्रगलिंगच्या काळात झाली. यानंतर आम्ही अनेक चित्रपटात सोबत कामही केले. अमिताभ व शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘बॉम्बे टू गोवा, नसीब, काला पथ्थर, दोस्ताना, शान’ यासारख्या सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोघांच्या मैत्रीला 4 दशकांहून अधिक काळ झाला असून त्यांची दुसरी पिढी अभिनय क्षेत्रात उतरली आहे. ‘यादो की बारात’ या कार्यक्रमातून या दोन कलावंताच्या मैत्रीचे किस्से अनुभवाला मिळणार आहेत. या कार्यक्रमाचा पहिला भाग 8 आॅक्टोंबर रोजी प्रसारित होणार आहे.