Join us

​सेक्स रॅकेटमध्ये फसलेल्या अभिनेत्रीचे पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2016 7:20 AM

२०१४ साली एका सेक्स स्कँ डलमध्ये फसलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता प्रसाद बासु पुन्हा एकदा चित्रपटात काम करताना दिसेल. ...

२०१४ साली एका सेक्स स्कँ डलमध्ये फसलेली बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता प्रसाद बासु पुन्हा एकदा चित्रपटात काम करताना दिसेल. ‘मकडी’ या चित्रपटात एका बालकलाकाराच्या रुपात काम केलेली श्वेता आता करण जौहरच्या एका चित्रपटात झळकणार आहे. याबाबत श्वेताचे वडील अनुज प्रसाद यांनी नुकताच खुलासा केला आहे.मिळालेल्या माहितीनूसार, श्वेता प्रसाद बासुला करण जौहरने आपल्या अपकमिंक चित्रपटासाठी साइन केले आहे. चित्रपटात तिच्या सोबत आलिया भट्ट आणि वरुण धवनदेखील आहेत. याशिवाय श्वेताला एकता कपूरनेदेखील आपली सीरियल चंद्रगुप्त मौर्यासाठी साइन केले आहे, ज्याची शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. काय होते श्वेताचे सेक्स स्कॅँडल२०१४ मध्ये हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये एका सेक्स स्कँडलमध्ये झारखंडच्या जमशेदपुरची अभिनेत्री श्वेता प्रसादाचे नाव आले होते. दोन महिन्यापर्यंत रेस्क्यू होममध्ये राहिल्यानंतर ती घरी वापस आली होती. मात्र नंतर हैदराबाद सेशन कोर्टने श्वेताला क्लीन चिट दिली होती. त्यानंतर तिने सांगितले की, मी अशा कोणत्याच रॅकेटमध्ये सहभागी नव्हती.