Join us  

उद्योगपती बॉयफ्रेंडसोबत फिरताना दिसली रिया चक्रवर्ती, बाईक राईडचा VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 1:37 PM

रिया चक्रवर्ती उद्योगपतीबरोबर रिलेशशिपमध्ये असल्याच्या चर्चा, कोण आहे ती व्यक्ती?

Rhea Chakraborty : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिया ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतनंतर (Sushant Singh Rajput) व्यावसायिक निखिल कामथला (Nikhil Kamath) डेट करत असल्याचं समोर आलं आहे. आता नुकतीच रिया निखिलसोबत बाईक राइडचा आनंद लुटताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. त्यामुळेच दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.

रिया व निखिलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  या व्हिडीओमध्ये  तिने क्रॉप टॉप, डेनिम जीन्स आणि डेनिम जॅकेट घातल्याचं दिसून आलं. तर निखिल ब्लॅक शॉर्ट्स आणि बॉम्बर जॅकेटमध्ये दिसला. मीडियाचे लक्ष टाळण्यासाठी दोघांनी काळे मास्क घातले होते. पण नेटकऱ्यांनी त्यांना लगेच ओळखले. 

रिया ही निखिलच्या बाईकवर मागे बसून फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. "सुशांत सिंह राजपूतच्या पैशांवर मज्जा करते", "आता आणखी एक आत्महत्या होण्याची शक्यता", "आता पुढचा नंबर याचा", अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. रिया आणि निखिलच्या डेटिंगच्या अफवा तेव्हा पसरल्या होत्या, जेव्हा हे दोघे कॉमेडीयन तन्मय भट्टसोबत एका पार्टीत सहभागी झाले होते. 

कोण आहे निखिल कामथ?निखिल कामथ हे बिझनेस जगतात मोठं नाव आहे. त्याच्या मेहनतीमुळे आज तो अगदी लहान वयात कोट्यधीश झाला आहे. निखिल कामथचा घटस्फोट झालेला आहे. २०१९ मध्ये, त्याने इटलीमध्ये देशातील एका मोठ्या हाऊसिंग ब्रँडची मालकीण अमांडा पूरवंकाराशी लग्न केले. मात्र लग्नानंतर काही काळानंतर दोघेही वेगळे झाले. निखिलचे नाव माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरशीही जोडले गेले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मानुषी छिल्लर आणि निखिल कामथ काही काळ एकमेकांना डेट करत होते. दोघांचे एकत्र फोटोही व्हायरल झाले होते. यापूर्वी रिया अभिनेता सुशांत सिंग राजपूतला डेट करत होती.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतसेलिब्रिटीबॉलिवूडबाईक