बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या कॉल डिटेल्सची गुरुवारी चौकशी करण्यात आली. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सुशांतने आत्महत्येच्या एक दिवस आधी अनेक बडे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांशी आधीच्या सिनेमांविषयी चर्चा केली होती. 12 मिनिटांच्या आत त्यांनी 5 वेळा कॉल केला. यात निखिल आडवाणी, रमेश तौराणी यांची नाव सामील आहे. रिपोर्टनुसार, रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्सचीही तपासणी करण्यात आली आहे. रियाने एक्स मॅनेजर श्रुती मोदीला अनेक फोन केले. श्रुती, सुशांतची एक्स मॅनेजर होती.
त्यानंतर रिया सुशांतच्या मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला कॉल केला, मग सुशांतशी बोलणं केले. श्रुती मोदी आणि सॅम्युअल मिरांडा विरोधात सुशांतच्या वडिलांनी आणि CBI ने FIR दाखल केले आहे. रिया चक्रवर्ती, तिचे वडील, आई, भाऊ यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. रिपोर्टनुसार रिया 147 वेळा सुशांतशी बोलली. 808 कॉल श्रुतीला तर 289 कॉल्स सॅम्युअलला केले. फिल्ममेकर महेश भट यांचं नाव देखील कॉल डिटेल्समध्ये समोर आले आहे.
रियाच्या कॉल रेकॉर्डमध्ये सुशांतला 31 आउटगोइंग कॉल रेकॉर्ड आहेत. तर 137 इनकमिंग कॉल्स आहेत. सीबीआय चौकशीत रिया चक्रवर्तीचे कॉल रेकॉर्ड महत्वाची भूमिका बजावू शकते. सीबीआय लवकरच रियाची चौकशी करणार आहे.