ड्रग्जप्रकरणी गजाआड असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने एनसीबीच्या चौकशीत काही मोठे खुलासे केले आहेत. सुशांत मला भेटण्याआधीपासून ड्रग्ज घ्यायचा. मी सुद्धा सुशांतला भेटण्याआधीपासून ड्रग्ज घ्यायची. मात्र ड्रग्जचे दुष्परिणाम लक्षात आल्यावर मी स्वत: ड्रग्ज घेणे कमी केले होते, असे रियाने म्हटले आहे. आजतकने रियाच्या जबाबाचे एक्सक्लुसिव्ह डिटेल्स मिळाल्याचा दावा केला आहे. या हवाल्याने आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या चौकशीत रियाने तिच्या व सुशांतबद्दल अनेक धक्कादायक दावे केलेत.सुशांत कॉन्सिपिरेसी थ्योरीवर विश्वास ठेवायचा. त्यामुळे तो कधीच स्वत:जवळ ड्रग्ज बाळगत नव्हता, असे रियाने सांगितले आहे.
मी आधीपासूनच ड्रग्ज घ्यायचे पण...सुशांत आयुष्यात येण्याआधीपासूनच मी ड्रग्ज घ्यायचे. मात्र सुशांतसोबत राहत असताना ड्रग्ज घेण्याचे माझे प्रमाण कमी झाले होते. कारण सुशांत खूप अधिक प्रमाणात ड्रग्ज घ्यायचा. ड्रग्जचे इतके दुष्परिणाम आहेत, हे लक्षात आल्यावर मी यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरु केले होते, असे रियाने एनसीबीच्या अधिका-यांसमोर कबुल केले.
कुटुंबाला माहिती नव्हती...मी आणि माझा भाऊ शौविक आम्ही ड्रग्ज घेतो, हे घरी माहिती नव्हती, असेही रियाने चौकशीदरम्यान सांगितले.
सोनू सूदचा नाव न घेता कंगनावर पुन्हा निशाणा, म्हणाला - 'सुशांत जिवंत असता तर...'
सारा अली खानसोबत सुशांतने पहिल्यांदा घेतला होता ड्रग्सचा हेवी डोस, रियाचा NCBसमोर खुलासा
केदारनाथच्या शूटींगदरम्यान सुशांतचे व्यसन वाढले होते...सुशांतच्या ड्रग्जच्या व्यसनाबद्दल तिने सांगितले की, सुशांत आधीपासूनच ड्रग्ज घ्यायचा. मात्र केदारनाथच्या शूटींगदरम्यान त्याचे व्यसन वाढले होते. आधी तो ड्रग्ज घ्यायचा. पण त्याचे प्रमाण मर्यादीत होते. तो अॅडिक्ट नव्हता. मात्र केदारनाथच्या शूटींगनंतर त्याचे व्यसन प्रमाणाबाहेर वाढले होते, असा दावाही रियाने केला.
सुशांत स्वत:जवळ कधीच ड्रग्ज ठेवायचा नाहीसुशांतला स्वत:जवळ ड्रग्ज ठेवण्यात भीती वाटायची. त्यामुळे तो त्याच्यासोबत काम करणा-या लोकांजवळ ड्रग्ज ठेवायचा. तो नेहमी दीपेश सावंत किंवा सॅम्युअल मिरांडाजवळ अशा गोष्टी ठेवायचा. तेच लोक त्याला ज्वाइंट बनवून द्यायचे. तो कधीच या लोकांना गाडीत बसवायचा नाही. कारण त्याला नारकोटिक्स आणि पोलिसांची भीती वाटायची. यामुळे ट्रॅव्हल करतानाही तो दोन गाड्या न्यायचा. एका गाडीत तो असायचा आणि दुस-या गाडीत त्याचे सहकारी, ज्यांच्याजवळ ड्रग्ज असायचे. सुशांत स्वत: कधीच ड्रग्ज पेडलर्सला कॉल करायचा नाही. त्याच्यासाठी दुसरे लोक ड्रग्ज मागवायचे किंवा खरेदी करायचे, असा दावाही रियाने केला.