Join us

Sushant Singh Rajput Case: रियाचा दावा, ड्रग्स नाही गांजाचे सेवन करायचा सुशांत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 11:20 AM

रियाला सीबीआयकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी अनेक एजन्सींकडून चौकशी सुरू असून यात मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीवर ड्रग्स संबंधीत आरोप लावण्यात आले आहेत. रियावर आरोप आहे की ती ड्रग्सचे सेवन करायची आणि सुशांतलाही ड्रग्स देण्याचे काम तिने केले. यावर आजतकला दिलेल्या मुलाखतीत रियाने स्वत:चा बचाव करत म्हणाली सुशांत आधीपासून गांजाचे सेवन करायचा. 

सुशांतच्या मृत्यूचा तपास सुरू असताना दररोज नवीन माहिती समोर येत आहे. सीबीआयनं तपास हाती घेतल्यापासून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. रिया अमली पदार्थ विकत घ्यायची अशी माहिती काही व्हॉट्सऍप चॅट्समधून समोर आली आहे. रियानं सुशांतला अमली पदार्थ दिले, असेही आरोप झाले आहेत. तशी माहिती व्हॉट्सऍप चॅटमधून समोर आली आहे. अमली पदार्थ दिले जात असल्याची कल्पना सुशांतला होती का, की त्याला नकळतपणे अमली पदार्थ दिले जात होते, याचा तपास आवश्यक असल्याचं सुशांतच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

रियाला सीबीआयकडून समन्स

रियाला सीबीआयकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. गेल्या आठवड्याभरापासून सीबीआयकडून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कूक नीरजची चौकशी करण्यात आली आहे. गेले सहा दिवस दररोज त्यांची चौकशी सुरू आहे. यानंतर आता आठवड्याभरानंतर रियाला सीबीआयनं समन्स बजावलं. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती