सुशांत सिंह राजपूत केसशी संबंधित ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. रिया ही सुशांतची गर्लफ्रेन्ड होती आणि ८ जून रोजी ती भांडण झाल्यावर सुशांतचं घर सोडून गेली होती. सुशांतच्या परिवाराने रियावर अनेक गंभीर आरोप केल्यावर रियाला सोशल मीडियातून ट्रोल केलं जातंय. इतकंच नाही तर तिचे जुने व्हिडीओही व्हायरल केले जात आहे.
अशात रिया चक्रवर्तीचा एक जुना व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झालाय. रिपोर्ट्सनुसार, रियाचा हा व्हिडीओ २०१३ मधील आहे. जेव्हा रिया एका ऑडिशनमध्ये गेली होती. या व्हिडीओत रिया 'पिंकी हैं पैसे वालों की' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. इंन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ खूप पाहिला जातोय. याचवर्षी रियाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं.
रियाचा हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावरील यूजर्स तिला ट्रोल करू लागले आहेत. एका यूजरने लिहिले की, 'मुंबई की ना दिल्ली वालों की, रिया हैं पैसे वालों की'. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, 'एकदम बरोबर गाणं निवडलंय'. एक यूजर म्हणाला की, 'आता तुरूंगात नाच'.
रिया चक्रवर्तीने तिच्या करिअरची सुरूवात २००९ मध्ये छोट्या पडद्यावरून केली होती. ती एमटीव्हीचा रिअॅलिटी शो Teen Diva मध्ये दिसली होती. ती हा शो जिंकली नाही, पण फर्स्ट रनरअप राहिली होती. त्यानंतर तिने दिल्लीमध्ये एमटीव्हीची व्हिडीओ जॉकी बनण्यासाठी ऑडीशन दिलं होतं आणि सिलेक्टही झाली होती.
२०१३ मध्ये रियाला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. रियाने बॉलिवूडमध्ये 'मेरे डॅड की मारूती' सिनेमातून अभिनयाला सुरूवात केली. नंतर सोनाली केबलमध्ये रिया मुख्य भूमिकेत होती. २०१७ मध्ये रिया 'हाफ गर्लफ्रेन्ड' आणि 'दोबारा - सी युअर इव्हिल' सिनेमात कॅमिओ रोलमध्ये दिसली होती. पण यातून ती फार काही कमाल दाखवू शकली नाही.
रियावर केस करण्याचा तयारीत मुकेश छाबडा
मीडिया रिपोर्ट्सनुसार मुकेश छाबडा रिया चक्रवर्तीवर सूडाची भावनेसोबत बदनाम करण्याची केस दाखल करू शकतो. यावर आपली बाजू मांडताना मुकेश छाबडा म्हणाला की, 'मी कधीच दारूही प्यायलो नाही तर ड्रग्सचा विषयच येत नाही. रियाने माझं नाव केवळ सूड घेण्यासाठी घेतलंय. आणि तिने ज्यांचही नावे घेतली ती सुद्धा तिने अशीच घेतली आहेत'.
'मी कधी दारू प्यायलो नाही, तर...'
मुकेश छाबडा पुढे म्हणाला की, 'रियाला वाटतं की, असं करून तिला केसमध्ये मदत मिळेल. पण हे चुकीचं आहे. माझा ड्रग्सशी काहीही संबंध नाही. मी कधीच सिगारेट आणि दारूही प्यायलो नाहीय. तर हार्ड ड्रग्स घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. सध्या मी हेच बघतो आहे की, काय करणं जास्त योग्य ठरेल. पण मला रियाला हाच सल्ला द्यायचा आहे की, तिने स्वत:वरून लक्ष हटवण्यासाठी दुसऱ्यांची नावे घेऊ नये. याने तिला काहीही मदत मिळणार नाही. मी दुसऱ्यांबाबत बोलू शकत नाही. पण माझं नाव या केसमध्ये केवळ सूड घेण्यासाठी ओढलं गेलं आहे'.
मुकेश छाबडा म्हणाला की, तो त्याच्या नावाचा गैरवापर होऊ देणार नाही. तो रिया विरोधात लीगल अॅक्शन नक्की घेणार आहे. रियाकडून त्याची बदनामी केली जात आहे. मुकेश छाबडा हाच सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा' चा दिग्दर्शक आहे.
सारा आणि रकुलचं नाव
रियाने एनसीबीसमोर सारा अली खान, रकुर प्रीत सिंह, सीमोन खंभाटा, रोहिणी अय्यर आणि मुकेश छाबडासहीत २५ लोकप्रिय लोकांची नावे घेत सांगितले होते की, हे लोक ड्रग्स घेतात. रियाने एजन्सीला सांगितले होते की, बॉलिवूडमधील ८० टक्के स्टार ड्रग्सचं सेवन करतात. आता हे सगळे लोक एनसीबीच्या रडारवर आहे.
हे पण वाचा :
शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता
सुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू
आपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, ड्रग्स चॅटिंगसाठी करायची आईच्या फोनचा वापर