संपूर्ण देशाचं ज्या प्रकरणाकडे लक्ष होतं ते प्रकरण म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूप्रकरणी सीबीआय काय निकाल देतंय याकडे. अखेर काल (२२ मार्च) सीबीआयने सुशांतच्या मृत्यूप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दिला. या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर (rhea chakraborty) अभिनेत्याच्या घरच्यांनी आरोप लावले होते. अखेर कोणतेही पुरावे न मिळाल्याने रियाला क्लीन चीट देण्यात आली. त्यानंतर रियाने केलेली पोस्ट चर्चेत आहे.क्लीन चिट मिळाल्यावर रिया काय म्हणाली?सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सबमिट केला. त्यामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चीट मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. यानंतर रियाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोच्या बॅकग्राऊंडला रियाने एक गाणं ठेवलं आहे. या इंग्रजी गाण्याचं नाव आहे सॅटिस्फाईड. म्हणजेच मी समाधानी आहे, अशा अर्थाने सुशांतची गर्लफ्रेंड रियाने पोस्ट केली आहे. अनेकांनी रिया आणि तिच्या कुटुंबाचं याविषयी अभिनंदन केलं आहे.
१४ जून २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ४ वर्ष ४ महिन्यांनी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. विशेष म्हणजे या क्लोजर रिपोर्टमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चीट मिळाल्याचे वृत्त समोर आले. सुशांतच्या कुटुंबाने रिया चक्रवर्ती हिच्यावर आरोप लावले होते मात्र त्यात पुरावे आढळले नाहीत. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाने सुशांत सिंह राजपूतच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाने केला होता.