Join us

आता अँकर्स माफी मागणार का? रिया चक्रवर्तीला जामीन मिळताच असे रिअ‍ॅक्ट झालेत बॉलिवूडकर

By रूपाली मुधोळकर | Published: October 07, 2020 3:11 PM

जा आणि आता थोडा आराम कर, असे ट्वीट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केले.  

ठळक मुद्दे रिया चक्रवर्तीला एनसीबीने गत 8 सप्टेंबरला अटक केली होती. आज रियाची 1 लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत  प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर येतात एनसीबीने अ‍ॅक्शनमोडमध्ये येते या प्रकरणी अभिनेद्धी रिया चक्रवर्तीला अटक केली होती. गेल्या महिनाभरापासून रिया तुरुंगात होती. आज अखेर रियाला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. रिया जेलमधून बाहेर येताच बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्यात.रियाच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिला पाठींबा दिला होता. तिला या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा आरोपही अनेकांनी केला होता. आता रियाला जामीन मिळताच सेलिब्रिटी वेगवेगळ्याप्रकारे रिअ‍ॅक्ट झालेत.

फरहान अख्तर म्हणाला, अँकर्स माफी मागणार का?

रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबाला दिलेल्या वाईट वागणुकीसाठी आता अँकर्स माफी मागणार का? मला नाही वाटत ते मागतील. परंतु आता ते त्यांचे गोलपोस्ट बदलताना नक्कीच दिसतील. ते यासाठीच कुख्यात आहेत, अशा शब्दांत रियाच्या जामीनावर फरहान अख्तरने रिअ‍ॅक्ट केले. यानिमित्ताने मीडियावरचा राग त्याने व्यक्त केला.

जा, जरा आराम कर

जा आणि आता थोडा आराम कर, असे ट्वीट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केले.  

आशा करते त्यांचा अहंकार सुखावला असेल...

जेलमध्ये रियाने जो काही काळ घालवला, त्यामुळे अनेकांचा अहंकार सुखावला असेल, अशी आशा आहे. सुशांतला न्याय मिळवून देण्याच्या नावावर ज्यांनी व्यक्तिगत व व्यावसायिक अजेंडा पुढे रेटणा-यांच्या मनातील कटुता संपावी अशी प्रार्थना करते. आयुष्य वाईट आहेच, पण अद्याप संपलेले नाही, अशा जळजळीत शब्दांत तापसी पन्नूने आपली प्रतिक्रिया दिली.

थँक्यू गॉड

या थोड्याच्या दयेबद्दल आभार देवा, असे ट्वीट फराह खान अलीने केले.

पाच अटींवर रियाला जामीन रिया चक्रवर्तीला एनसीबीने गत 8 सप्टेंबरला अटक केली होती. आज रियाची 1 लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियासोबत तिचा भाऊ शोविकलाही अटक झाली होती. कोर्टाने शोविकचा जामीन अर्ज मात्र फेटाळला आहे. शोविकसोबत अब्दुल बसितचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.

 पुढील पाच अटींवर रियाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

* रियाचा पासपोर्ट  कोर्टात जमा करण्यात आला आहे. देशाबाहेर जर तिला जायचे असेल तर त्या आधी तिला कोर्टाकडून परवानगी घ्यावी लागणार.  

* रियाला 10 दिवस 11ते 5 या वेळेत रियाला जवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसेच NCB जेव्हा चौकशीसाठी       बोलवले तेव्हा हजर रहावे लागले. 

जामीनासाठी रियाला  1 लाख रुपयांचा बॉन्ड भरावा लागाला आहे. 

*रिया चक्रवर्ती जोपर्यंत कोर्टात प्रकरण सुरु आहे तोवर देशाबाहेर जाण्यास परवानगी नाही.

 * रिया इतर अन्य साक्षीदारांना भेटण्यास मनाई आहे. 

In Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी? सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूतफरहान अख्तर