Join us

"...सीता भी यहां बदनाम हुई"; महेश भट्टसोबत नाव जोडणाऱ्यांना रियानं दिलं होतं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 18:39 IST

८ जून रोजी सुशांतचं घर सोडल्यानंतर रियाने महेश भट्ट यांना मेसेज केला होता की, 'आयशा पुढे निघाली आहे सर, जड मन आणि एका शांततेसोबत. तुमच्यासोबत बोलणं झाल्यावर माझे डोळे उघडले गेले.

रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंग राजपूत यांच्यात अफेअर होते म्हणूनच रिया सुशांतसह लिव्हइनमध्येही राहत होती. मात्र कधीच या दोघांनी उघडपणे त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. दोघांचे एकत्र राहणे, फिरणे अशा सगळ्यांगोष्टींमुळे त्यांच्यात मैत्रीपलिकडेही नाते असल्याच्या  चर्चा जोर धरत होत्या. सुशांतने आत्महत्या करण्याआधीच रिया चक्रवर्तीला तिच्या घरी परत पाठवले होते. रियाला सुशांत डिप्रेशनमुळे त्रस्त असल्याचे माहिती होते. म्हणून सुशांतसह ती राहत असल्याचे तिने म्हटले होते. त्याच दरम्यान निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांनी रिया चक्रवर्तीला सुशांतपासून दूर केल्याचे बोलले जात गेले.  सुशांतपेक्षा रियाचे महेश भट्ट यांच्यासह जास्तच जवळीक होती. सर्रास दोघांचे व्हायरल होणा-या फोटोंमुळे त्यांच्या नात्यांवरही बोलले जायचे. 

नुकतेच महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्यातील व्हाट्स अॅप चॅट बाबतची माहिती समोर आल्यानंतर महेश भट्ट आणि रिया यांच्या नात्यावरही निशाणा साधला जात आहे. दरम्यान सुशांतसह नात्यात असतानाच रियाचे महेश भट्टसह नाव जोडले जायचे. तिला अनेकवेळा ट्रोलही केले गेले. याच गोष्टीला वैतागुन रियाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत नेटीझन्सना उत्तर दिले होते. ''तू कौन है, तेरा नाम है क्या? सीता भी यहां बदानम हुई'' अशी कॅप्शनहीतिने या फोटोला दिली होती.एकंदरितच दोघांच्या नात्यावर कोण काय बोलते याचा रियाला अजिबात फरक पडत नसल्याचेच यातून समोर आले होते.

८ जून रोजी सुशांतचं घर सोडल्यानंतर रियाने महेश भट्ट यांना मेसेज केला होता की, 'आयशा पुढे निघाली आहे सर, जड मन आणि एका शांततेसोबत. तुमच्यासोबत बोलणं झाल्यावर माझे डोळे उघडले गेले.तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आहात. तुम्ही तेव्हाही होते आणि आजही आहात'. एका दुसऱ्या मेसेजमध्ये रियाने लिहिले की, 'तुम्ही मला पुन्हा आझाद केलंय, रियाला  महेश भट्ट यांनी उत्तर दिलं की, आता मागे वळून बघू नकोस. तुझ्या वडिलांना माझ्याकडून प्रेम दे. आता ते फार आनंदी होतील'.

टॅग्स :रिया चक्रवर्तीमहेश भट