सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीची सीबीआयची टीम सतत चौकशी करते आहे. आज पुन्हा पाचव्या दिवशी सीबीआय रियाची चौकशी करणार आहे. रिया तिच्या बिल्डिंगमध्ये मीडिया जमल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
रिया म्हणाली - मीडियाने तिच्या रस्त्यात येऊ नये
मुंबईच्या एक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने आपल्या बिल्डिंगच्या आता जमा होणाऱ्या मीडियाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिने सांगितले, मीडियाला सांगावे माझ्या रस्त्यात अडथळा आणू नये. तसेच संविधानाच्या अधिकारानुसारच काम करावे.
रियाने शेअर केला होता व्हिडीओ रिया अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती ईडीच्या कार्यालयातून घरी येत असताना इमारतीच्या आवारात दिसत होते. त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला होता. 'हा व्हिडीओ माझ्या इमारतीच्या कंपाऊंडमधील आहे. त्या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती माझे वडील इंद्रजीत चक्रवर्ती (निवृत्त लष्करी अधिकारी) आहेत. आम्ही घराबाहेर पडून ईडी, सीबीआय आणि विविध तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय. पण माझ्या आणि कुटुंबाच्या जीविताला धोका आहे,' असं रियानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओसोबत म्हटलं होतं.