रियाला ड्रग्स आणून देण्यासाठी सुशांतच्या घरातील या दोन व्यक्तींची होती साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 12:28 PM2020-08-27T12:28:55+5:302020-08-27T12:39:07+5:30
एनसीबीने ड्रग्सचा उल्लेख झाल्यावर चौकशीसाठी केस दाखल केली आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला दरदिवशी नवं वळणं लागतंय. एनसीबीने ड्रग्सचा उल्लेख झाल्यावर चौकशीसाठी केस दाखल केली आहे. ज्यात मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला बनवण्यात आले आहे. रियावर सुशांतला ड्रग्स देण्याचा आरोप लावण्यात आला आहे. असे काही व्हाट्सअॅप समोर आले आहेत ज्यात रिया सुशांतच्या स्टाफसोबत ड्रग्सच्या व्यवहाराविषयी चर्चा केल्याची माहिती आहे.
दिपेश सावंत ड्रग्स घेऊन यायचा ?
एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, रिया आणि सुशांतचा स्टाफ यांच्यामध्ये ड्रग्सबाबत व्हाट्सअॅपवर चर्चा झाली होती. रिया स्टाफ सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंतकडून ड्रग्स मागवायची. याचे सेवन रिया आणि सुशांत दोघे करायचे. रिपोर्टनुसार दिपेश सावंतचं नेहमी ड्रग्स घेऊन याचाच आणि रिया-सुशांतला द्यायचा.
रियाच्या मोबाइलमधील चॅट तपासले असता तिने ड्रग पेडलर जया सहाबरोबर सुशांतला किती ड्रग्ज द्यायचे यासंदर्भात विचारल्याचे समोर आले आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यात रिया आणि दिपेशमध्ये यांच्यामध्ये झालेल्या चॅटला घेऊन दावा केला गेला आहे की, ज्यामध्ये तो रियाला सांगतोय, तो पाच हजार रुपयांमध्ये 'ग्रीन बॅग' घेऊन येत आहे.
सुशांतचे वडील के. के. सिंग यांनी रिया माझ्या मुलाची खुनी आहे. ती बऱ्याच कालावधीपासून माझ्या मुलाला विष देत होती. तिला आणि तिच्या साथीदारांना तातडीनं अटक करण्यात यावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे.