Join us

सुशांतला आध्यात्मिक गुरुकडे घेऊन गेली होती रिया चक्रवर्ती, केले होते उपचार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 11:58 AM

खुद्द आध्यात्मिक गुरुनेच केला खुलासा

ठळक मुद्देसुशांत खरोखर नैराश्यात होता का असा प्रश्न  विचारला असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी आता एक नवी माहिती समोर येतेय. होय, सुशांतच्या डिप्रेशनवर इलाज करण्याच्या इराद्याने रिया चक्रवर्ती त्याला एका अध्यात्मिक गुरुकडे घेऊन गेली होती, असा नवा खुलासा झाला आहे. खुद्द या आध्यात्मिक गुरुनेच हा खुलासा केला आहे.‘टाइम्स नाऊ’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.   या आध्यात्मिक गुरूंचे नाव मोहन सदाशिव जोशी आहे. चॅनलशी बोलताना जोशी यांनी रिया सुशांतला त्यांच्याकडे घेऊन आल्याचे सांगितले.

‘सुशांत डिप्रेशनमध्ये होता. यामुळे रिया 22 आणि 23 नोव्हेंबर 2019 रोजी सुशांतला माझ्याकडे घेऊन आली होती. मी 22 नोव्हेंबरला त्याच्यावर उपचार केले होते. 23 नोव्हेंबरला मी रिया व सुशांतसोबत भोजनही केले होते.  रियानेच त्यांच्याशी संपर्क करत सुशांत नैराश्यात असल्याचे सांगितले होते,’ असे जोशी यांनी सांगितले. विशेष म्हणजे, मी सुशांतला 90 टक्के बरे केले होते, असा दावाही त्यांनी यावेळी केला.सुशांतप्रकरणी मुंबई पोलिसांनी मला जबाब नोंदवण्यासाठी बोलवले होते. पण वय आणि प्रकृती बघता मी पोलिस ठाण्यात जाऊ शकलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आध्यात्मिक गुरू जोशी यांचे वय 70 वर्षे आहे.  प्रसिद्ध उद्योजक धीरूभाई अंबानी आणि कर्नाटकच्या एका माजी मुख्यमंत्री अशा अनेक दिग्गजांवर उपचार केल्याचा त्यांचा दावा आहे. 

काळी जादू नाही, पण सफेद जादू म्हणता येईल

सुशांतवर काळ्या जादूने उपचार केले का? असा प्रश्न टाईम्स नाऊच्या मुलाखतीत जोशी यांना विचारला गेला. यावर  याला काळी जादू म्हणता येणार नाही पण सफेद जादू म्हणू शकता. मी माझ्या  हातांनी उर्जा हस्तांतरित करतो. मी कुठलीही पूजा वगैरे करत नाही. मी पूर्णपणे नास्तिक व्यक्ती आहे.  सुशांतवरही मी उपचार केलेत आणि तो 90 टक्के बरा झाला होता. मी कधीही स्वत:ची जाहिरात करत नाहीत. लोक माझा शोध घेत माझ्याकडे येतात. रिया सुद्धा माझा शोध घेत माझ्यापर्यंत पोहोचली होती, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, सुशांत खरोखर नैराश्यात होता का असा प्रश्न  विचारला असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती