सुशांत सिंह राजपूत केस सीबीआयच्या ताब्यात गेल्यापासून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पण रिया चक्रवर्तीने मीडियासमोर आतापर्यंत काहीही स्पष्टीकरण दिले नव्हते. ती आता मीडियासमोर आली आहे. या केसमध्ये चारही बाजूंनी वेढल्या गेलेल्या रियाने आता एका वेबसाइटला मुलाखत दिली आहे. आतापर्यंत गप्प बसलेली रिया आता आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
रिया म्हणाली - माझी एकच चूक झाली
एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रियाने सुशांतबाबतच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात तिने तिच्या एका चुकीबाबत सांगितले. ती म्हणाली की, तिने एक चूक केली होती. ती म्हणजे सुशांत सिंह राजपूतवर प्रेम केलं. ती म्हणाली की, याने काहीही फरक पडत नाही की, कोणती एजन्सी तपास करत आहे आणि कोण चौकशी करत आहे. पण तिच्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ईडीकडून रियाची मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टीने विचारपूस करण्यात आली. रियाच्या काही व्हॉट्सअॅप चॅट्स जे ड्रग्सबाबत इशारा करत होते ते नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडे सोपवण्यात आले आहेत. जेणेकरून या केसमधील ड्रग्स अॅंगलची चौकशी केली जावी.
रियाच्या भावासोबत इतरही लोकांवर केस
एनसीबीने ड्रग्सचा उल्लेख झाल्यावर चौकशीसाठी केस दाखल केली आहे. रिया विरोधात क्रिमिनल केस दाखल झाली आहे. ज्या लोकांची नावे ईडीच्या एफआयआरमध्ये होते त्यांच्या विरोधात एनसीबीने केस दाखल केली आहे. त्यात रियाच्या भावाचाही समावेश आहे.
सुशांतला फ्लाइटमध्ये बसण्याची भीती
आजतकसोबत बोलताना रिया चक्रवर्तीने यूरोप ट्रिपच्या आणखी काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की, यूरोपच्या ट्रिपवर जेव्हा आपण जात होतो, तेव्हा सुशांतने सांगितले होते की, त्याला फ्लाइटमध्ये बसण्याची भीती वाटते. त्यासाठी तो एक औषध घेत होता. ज्याचं नाव मोडाफिनिल आहे. फ्लाइटआधी त्याने ते औषध घेतलं. कारण ते औषध त्याच्याकडे नेहमी राहत होतं.
खूप खर्चाबाबत सुशांतला टोकले होते
रियाने सांगितले की, 'पॅरिसमध्ये माझं एक शूट होणार होतं. यासाठी इव्हेंट ऑर्गनाइज कंपनीकडून फ्लाइटची तिकीटे आणि हॉटेलचं बुकींग झालेलं होतं. पण ही सुशांतचीच आयडिया होती की, या निमित्ताने यूरोपची ट्रिप करूया. सुशांतने नंतर माझे तिकीट्स कॅन्सल केले आणि स्वत:च्या पैशाने फर्स्ट क्लासचं तिकीट बुक केलं होतं. मी त्याला म्हणाले होते की, तू फार जास्त पैसे खर्च करतोय'.
हे पण वाचा :
'सुशांतवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याला ड्रग्स दिले जायचे', वकील विकास सिंग यांचा दावा