बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये सीबीआयची एन्ट्री होताच रिया चक्रवर्तीबाबत अनेक आश्चर्यकारक खुलासे होत आहेत. रोज नवनवीन माहिती समोर येत असल्याने रियाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. रियावर सुशांतवर जादू टोना आणि ड्रग्स देण्याचे आरोप आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच रियाने एका न्यूज चॅनलला मुलाखत दिली. न्यूज चॅनलला मुलाखत देऊन तिचं तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर रियाने सुशांतच्या परिवारावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत.
'मला सुशांतकडून बाळ हवं होतं'
या मुलाखतीत रिया चक्रवर्तीने सांगितले की, 'आम्ही दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की, आयुष्यभर एकमेकांना साथ देतील. मला सुशांत सिंह राजपूतकडून एक बाळ हवं होतं जे हुबेहुब त्याच्यासारखं दिसलं असतं. मी त्याला लिटील सुशी म्हणून हाक मारणार होते. तो पूर्णपणे सुशांतसारखा दिसला असता. आम्ही नेहमीच एका कपलसारखे बोलत होतो.
आमची मैत्री प्रेमात कधी बदलली कळलंच नाही'
पुढे रियाने सांगितले की, 'मला चांगल्याप्रकारे आठवतं की, आमची भेट कशी झाली होती. सर्वातआधी सुशांतनेच मला प्रपोज केलं होतं. माझ्या आयुष्यात येणाऱ्या लोकांमध्ये सुशांत सिंह राजपूत सर्वात इमानदार होता. सुशांतचे आणि त्याच्या वडिलांचं नातं ठिक नव्हतं. त्यामुळे सुशांत नेहमीच चिंतेत राहत होता'.
८ जून रोजी काय झालं?
रियाने सांगितले की, '८ जून रोजी माझं एक थेरपी सेशन बुक होतं. डॉक्टर सुजेन वॉकर यांच्यासोबत. ते सकाळी ११.३० वाजता येणार होते. यातून हे स्पष्ट होतं की ८ जूनला सुशांतचं घर सोडून जाण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. मी माझ्या घरी हे थेरपी सेशन करू शकत नव्हते. माझी अजिबात इच्छा नव्हती की, मला माझ्या परिवाराने अशा स्थितीत बघावं. कोणतेही आई-वडील आपल्या मुलांना असं बघू शकणार नाहीत'.
रिया पुढे म्हणाली की, 'त्यामुळे ८ जूनला जेव्हा माझं थेरपी सेशन होतं, तेव्हा मी सुशांतला हे सांगितलं होतं. तर मला नाही म्हणाला. तो म्हणाला की, आज थेरपी सेशन इथे करू नकोस. तू तुझ्या घरी जा. तर मी त्याला म्हणाले की, मला थेरपी सेशन करून जाऊ दे. तरी तो नाही म्हणाला. त्याने मला थेरपी सेशनआधीच जाण्यास सांगितले होते. तो म्हणाला होता की, त्याची बहीण येत आहे. तिचा फोन आला होता'.
'सुशांतच्या परिवाराने माझे आयुष्यच त्यांनी संपवून टाकले'
मी त्याची इतकी काळजी घेतली, त्याच्याजवळ राहून त्याला डिप्रेशनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. इतकं सगळं करूनही आज मला सुशांतच्या मृत्यूला जबाबदार धरले जात आहे. सुशांतवर माझे जीवापाड प्रेम होते. त्याच्या जाण्याने मी पुरती उध्वस्थ झाले आहे. यात सुशांतचे कुटुंबिय मला अशा प्रकारे त्रास देत आहेत. त्यांनी तर माझं जगणंच मुश्किल करून टाकले आहे.
माझे आयुष्यच त्यांनी संपवून टाकले आहे. माझ्या घराचे हफ्ते मी कसे फेडणार? कदाचित यापुढे माझा भाऊ कॉलेजमध्ये जाऊ शकणार नाही ? माझी आई या सगळ्या टेंशनमध्ये कधीही हॉस्पिटलमध्ये एडमिट होवू शकते, अशी तिची अवस्था झालीय. काय होणार आता यापुढे माझे? मी एक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे. जिथे आदर नाही तिथे काहीच नाही..... असे रियाने आपली बाजू मांडताना सांगितले आहे. सुशांतच्या मृत्युला एक मजाक बववून ठेवले आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास कुणीही करो, मला काहीच फरक नाही, कारण माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असेही ती म्हणाली.
हे पण वाचा :
८ जून रोजी सुशांतचं घर सोडण्याआधी नेमकं काय झालं होतं? रियाने दिली त्या दिवसाची डिटेल्ड माहिती!
सुशांतच्या वडिलांना कसे माहीत त्याच्या अकाऊंटमध्ये १७ कोटी रूपये आहेत? - रिया चक्रवर्ती