सुशांतच्या कुटुंबाने माझे आयुष्य बरबाद केले, कुठेच तोंड दाखवयला जागा सोडली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 12:21 PM2020-08-28T12:21:32+5:302020-08-28T12:22:11+5:30

मी सुशांतवर कधीही नियंत्रण मिळ‌वण्याचा प्रयत्न केला नाही.सुशांतच्या कुटुंबियांना इतकीच त्याची काळजी होती तर का त्याच्याबरोबर राहायला आले नाहीत. का त्याला एकट्याला राहू दिले?

Rhea Chakraborty says Sushant Singh Rajput's family has destroyed her life | सुशांतच्या कुटुंबाने माझे आयुष्य बरबाद केले, कुठेच तोंड दाखवयला जागा सोडली नाही

सुशांतच्या कुटुंबाने माझे आयुष्य बरबाद केले, कुठेच तोंड दाखवयला जागा सोडली नाही

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह मृत्यूप्रकणारमुळे अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर जगाची नजर होती. अखेर समोर येत तिने पहिल्यांदा आपली बाजू मांडली आहे. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने तिची बाजु मांडताना सांगितले की, सुशांतच्या निधना नंतर मला टार्गेट केले जात आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी मला सुशांतच्या मृत्यूला जबाबदार धरले आहे. माझ्यामुळे सुशांतचा मृत्यू झाला याचा पुरावा काय? उलट सुलट चर्चा घडवून आणून मला बदनाम केले जात असल्याचे तिने म्हटले आहे. मी सुशांतवर कधीही नियंत्रण मिळ‌वण्याचा प्रयत्न केला नाही. सुशांतच्या कुटुंबियांना इतकीच त्याची काळजी होती तर का त्याच्याबरोबर राहायला आले नाहीत. का त्याला एकट्याला राहू दिले? 

मी त्याची इतकी काळजी घेतली, त्याच्याजवळ राहून त्याला डिप्रेशनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. इतकं सगळं करूनही आज मला सुशांतच्या मृत्यूला जबाबदार धरले जात आहे. सुशांतवर माझे जीवापाड प्रेम होते. त्याच्या जाण्याने मी पुरती उध्वस्थ झाले आहे. यात सुशांतचे कुटुंबिय मला अशा प्रकारे त्रास देत आहेत. त्यांनी तर माझं जगणंच मुश्किल करून टाकले आहे. 

माझे आयुष्यच त्यांनी संपवून टाकले आहे. माझ्या घराचे हफ्ते मी कसे फेडणार? कदाचित यापुढे माझा भाऊ कॉलेजमध्ये जाऊ शकणार नाही ? माझी आई या सगळ्या टेंशनमध्ये कधीही हॉस्पिटलमध्ये एडमिट होवू शकते, अशी तिची अवस्था झालीय. काय होणार आता यापुढे माझे? मी एक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे. जिथे आदर नाही तिथे काहीच नाही..... असे रियाने आपली बाजू मांडताना सांगितले आहे. सुशांतच्या मृत्युला एक मजाक बववून ठेवले आहे. सुशांतच्या मृत्यूचा तपास कुणीही करो, मला काहीच फरक नाही, कारण माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असेही ती म्हणाली.


 

Web Title: Rhea Chakraborty says Sushant Singh Rajput's family has destroyed her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.