Join us

सुशांतसोबत राहून मी पण डिप्रेशनमध्ये गेले असते, म्हणून मी.....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 2:12 PM

कोणी मला जहरीली नागिन बोलतंय तर तर कोणी थेट मला महेश भट्ट यांची मी गर्लफ्रेंड असल्याचेही बोलले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह मृत्यूप्रकणारमुळे अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर जगाची नजर होती. अखेर समोर येत तिने पहिल्यांदा आपली बाजू मांडली आहे. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांत डिप्रेशनमध्ये होता, त्याला ट्रिटमेंट घ्यायची असल्याचे  मला सांगितले होते. सुशांतला कोणत्या डॉक्टरकडे ट्रिटमेंट घ्यायची आहे हे तो स्वतः ठरवायचा. ट्रिटमेंटसाठी तो एडमिटही झाला होता. पण तरीही त्याची मानसिक स्थिती ढासळत होती. कुठेही सुधारणा दिसत नव्हती. शेवटी - शेवटी मलाही त्याच्याबरोबर राहून भीती वाटायला लागली. मला मानसिक आजाराबाबत फारसे माहिती नाही त्यामुळे कसं सगळं सांभाळावे समजत नव्हते. 

कधी-कधी सुशांतकडे पाहून मी देखील डिप्रेशनमध्ये जाते की काय ? अशी माझी अवस्था होत होती. सुशांतनेच मला त्याचे घर सोडून जायला सांगितले. जेव्हा एखादा माणूस तुम्हाला असे सांगतो तुम्ही रागात घर सोडून जाणारच ना? मलाही खूप वाईट वाटले. ज्याच्यावर मी इतके प्रेम केले, काळजी घेतली. आज तोच मला घर सोडून जायला सांगत आहे. मी पण निघून गेले. मलाही वाटत होत सुशांतसह राहण्यात आता काही अर्थ नाही. 

तिथून माझी सुटका कशी होईल याचीच मी वाट बघत होते. ज्या दिवशी मी त्याचे घर सोडले तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला... आणि म्हणून सुटकेचा श्वास घेत मी महेश भट्ट यांना व्हॉटसअप मेसेज केला. कुठेतरी मी यात फसले होते असेच मला वाटत होते. म्हणून भट्ट यांनी  मागे वळून न पाहण्याचा सल्ला दिला होता. यापुढे केवळ आपल्या वडिलांचा विचार कर ते जास्त खुश होतील असे त्यांनी मला सांगितले होते. यातून माझी सुटका केल्याबद्दल मला वाचवल्याबद्दल महेश भट्ट यांचे आभार मानले होते.

आता तर लोकांनी इतक्या माझ्या बद्दल उलट सुलट चर्चा करायला सुरूवात केली की त्याला कोणतीही मर्यादाच राहिली नाही. कोणी मला जहरीली नागिन बोलतंय तर तर कोणी थेट मला महेश भट्ट यांची मी गर्लफ्रेंड असल्याचेही बोलले जात आहे. जरा विचार तर करा मी त्यांच्या मुलीच्या वयाची आहे. ते देखील मला त्यांच्या मुलीप्रमाणेच समजतात. त्या्ंच्या नावाशी माझे नाव जोडताना थोडाही विचार केला जात नाही. 'माझा एकच गुन्हा झाला मी सुशांतवर प्रेम केले. तपास कार्यात मला जे काही विचारण्यात आले त्याची मी सगळी उत्तरे दिली आहेत.काहीच लपवले नाही', असे रियाने म्हटले आहे.

टॅग्स :रिया चक्रवर्तीमहेश भट