सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर एक ना अनेक आरोप झेलणारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा एक व्हिडीओ सध्या जबरदस्त व्हायरल होतोय. यात रिया वांद्रयात फुले खरेदी करताना दिसतेय. रियाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि लोकांनी तिला ट्रोल करणे सुुरू केले. कारण उद्या 21 जानेवारीला सुशांतचा वाढदिवस आहे. त्यामुळे सुशांतच्या वाढदिवसाआधीचा ड्रामा अशा कमेंट लिहित लोकांनी रियाला ट्रोल केले.फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. यात रिया तिच्या कारमधून उतरून फुटपाथवरच्या फुलांच्या दुकानात जाताना व फुले खरेदी करताना दिसत आहे. रिया दिसताच फोटोग्राफर्सचे कॅमेरे तिच्या मागे धावतात. यामुळे रिया काहीशी नाराज होते. यार फूल खरीदने आई हूं, जाओ न, असे ती म्हणते. मला फॉलो करू नका, असेही ती म्हणते.
रियाचा हा व्हिडीओ पाहताच सुशांतच्या चाहत्यांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. ही आता कोणासाठी फुले खरेदी करतेय, आता नवा कोण आहे? अशी कमेंट एका युजरने केली. हिला अजिबात प्रमोट करू नका, असे म्हणत काहींनी आपला संताप व्यक्त केला. तर एका युजरने, ‘सुशांतच्या वाढदिवसाआधीचा ड्रामा’ असे लिहित तिला ट्रोल केले.उद्या दिवंगत अभिनेता सुशांतचा वाढदिवस आहे. यामुळे सध्या ट्विटरवर ‘वन डे फॉर एसएसआर बर्थ डे’ ट्रेंड करतोय.
सुशांतच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबीयांनी रियाला जबाबदार ठरवत, तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.यानंतर सुशांतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रिया व तिच्या भावाचे नाव आले होते. याप्रकरणी रिया व शौविक दोघांनाही एनसीबीने अटक केली होती.सुमारे महिनाभर रिया तुरुंगात राहिली. तुरुंगातून बाहेर आल्यापासून रिया कुठेही दिसली नाही. पण अलीकडे घर शोधण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा ती घराबाहेर दिसली होती. तुरूंगातून परत आल्यानंतर रिया चक्रवर्तीवर घर सोडण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे म्हटले जात आहे. आजही मीडियाचे कॅमेरे तिच्या घराबाहेर असतात. मीडियाचा पिच्छा सोडवण्यासाठी रिया राहते घर सोडून नवीन घरात शिफ्ट होण्याच्या विचारात असल्याचेही सांगितले जात आहे.