बी-टाऊनमध्ये सध्या सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या लव-अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. दोघे सतत व्हॅकेशन, डिनर डेटवर एकत्र दिसतात. मात्र हे नाते पब्लिक होऊ नये, यासाठी सुशांत व रियाने बरेच प्रयत्न केलेत. काही दिवसांपूर्वीच दोघे एकत्र पॅरिसमध्ये स्पॉट झाले होते. जिथे ते शॉर्ट ट्रिपसाठी गेले होते. याशिवाय दोघे एकमेकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कमेंट्स करताना दिसत असतात. दोघांनी या रिलेशनशीपवर कोणतेच भाष्य केले नाही.
दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार ETAने केलेल्या इन्स्टा लाईव्ह दरम्यान रिया चक्रवर्तीने सुशांत सोबतच्या नात्याबाबत अनेक खुलासे केले.
रिपोर्टनुसार रियाने म्हणाली, ''मी आणि सुशांत सिंग राजपूतने कधीच हे स्वीकारले नाही त्यामुळे हे खरं नाही आहे. सुशांत आणि माझ्यात खूप चांगली मैत्री आहे. आम्ही एकमेकांना आठ वर्षांपासून ओळखतो. आमच्या दोघांचा एकच मॅनेजर होता. त्यामुळे आमच्यातील मैत्री आणखी वाढली. माझं माझ्या सगळ्या मित्रांवर प्रेम आहे आणि हे मी लपवत नाही कधी. सुशांत हा खूप चांगली व्यक्ती आहे. माझ्यासाठी तो खूपच गोंडस आणि आकर्षक माणूस आहे. मला नाही माहिती तो माझ्याबद्दल काय विचार करतो ते.''