Join us

अंकिता लोखंडेने दाखवला ‘पॉवर ऑफ वुमन’, रिया चक्रवर्तीच्या ‘विधवा’ कमेंटवर असे दिले प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 10:36 AM

अंकिताने सोशल मीडियावर स्वत:चे काही फोटो शेअर केलेत. हे फोटो शेअर करताना तिने रियाला जोरदार टोला लगावला.

ठळक मुद्देगेल्या चार वर्षांपासून सुशांत आणि अंकिता संपर्कात नव्हते, असे असताना अंकिता अचानक त्याच्याबद्दल का बोलतेय, असा प्रश्न रियाने या मुलाखतीत उपस्थित केला होता.

सुशांत सिंग राजपूत मृत्यूनंतर सुमारे 75 दिवसांनी रिया चक्रवर्ती मीडियासमोर आली आणि यादरम्यान स्वत:वरचे सर्व आरोप तिने खोडून काढलेत. याच मुलाखतीत रियाने सुशांतच्या कुटुंबावर आरोप केलेत. इतकेच नाही तर सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिच्यावरही ती घसरली. ब्रेकअपनंतरच्या चार वर्षांत अंकिता एकदाही सुशांतला भेटली नाही आणि आता त्याच्या मृत्यूनंतर त्याची विधवा असल्याचे ढोंग करतेय, असे काय काय रिया बोलली. तिच्या या वक्तव्यानंतर आता अंकिताही मैदानात उतरल्याचे दिसतेय. सोशल मीडियावर तिने रियाला खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे.

अंकिताने सोशल मीडियावर स्वत:चे काही फोटो शेअर केलेत. हे फोटो शेअर करताना तिने रियाला जोरदार टोला लगावला. ‘लडकियां छोटी छोटी बातों पर रो देती हैं, पर लाइफ की बडी से बडी मुश्किल हंसते हंसते हेंडल कर लेती है,’ असे तिने लिहिले. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. सुशांत डिप्रेशनमध्ये होता, याचा अंकिताने स्पष्टपणे इन्कार केला होता. मी व सुशांत 23 फेब्रुवारी 2016 पर्यंत सोबत होतो. तेव्हा तो अजिबात डिप्रेशनमध्ये नव्हता. कुठलाही उपचार घेत नव्हता. तो अगदी ठणठणीत होता, असे अंकिताने म्हटले होते.

मुलाखतीत काय म्हणाली होती रियागेल्या चार वर्षांपासून सुशांत आणि अंकिता संपर्कात नव्हते, असे असताना अंकिता अचानक त्याच्याबद्दल का बोलतेय, असा प्रश्न रियाने या मुलाखतीत उपस्थित केला होता. सुशांतच्या निधनानंतर अंकिता त्याची विधवा बनल्याचे ढोंग करतेय.   अनेक खोट्या अफवा पसरवते आहे. माझ्यावर सुशांतचे पैसे हडपल्याचा, त्याच्यावर ताबा मिळवल्याचा आरोप होतोय. असे असते तर मी सर्वप्रथम सुशांतला अंकिता राहत असेलल्या घराचे हफ्ते भरण्यापासून थांबवले असते. अंकिताने सुशांतवर प्रेम केले होते, मी देखील त्याच्यावर प्रेम केले, या परिस्थितीत तिने माझे दु:ख समजून घ्यायला हवे होते, असे देखील रियाने म्हटले होते. 

टॅग्स :अंकिता लोखंडेरिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत