सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्ती आणि इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त करणे, गुन्हेगारी षडयंत्र रचणे, चोरी-फसवणूक आणि धमकी यासारखे गुन्हे नोंदवण्यात आले आहे. हे प्रकरण सतत काहीतरी नवे खुलासे होतायेत.
सीबीआय चौकशीत सर्वांची नजर रियाकडे आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने त्याचा ई-मेल चालवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर त्यांनी अनेक मेल हटवून ई-मेलमध्ये छेडछाडही केली आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार,रियाने सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा ई-मेल सुरु करण्याचा प्रयत्न केला. हाच प्रयत्न सुशांतच्या मृत्यूच्या दिवशीसुद्धा करण्यात आला होता. रियाने ई-मेल ओपन करुन त्याचा पासर्वड बदलण्याचाही प्रयत्न केला. जेणेकरून इतर कोणीही तो एक्सेस करु नाही शकणार नाही. रियाबद्दलचे हे खुलासे तिच्या अडचणी अधिक वाढ करणार आहे.सुशांतची मॅनेजर दिशाच्या मृत्यूनंतर म्हणजेच 8 ते 13 जून दरम्यान सुशांतने रियाला अनेक फोन केले. मात्र रियाने त्याचा नंबर ब्लॉक केल्याने सुशांत तिच्यापर्यंत पोहोचू शकला नाही.