Join us

रिया चक्रवर्तीला जेलमध्ये मिळाली VIP ट्रीटमेंट?, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 2:20 PM

एनसीबीने सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला मंगळवारी अटक केली.

एनसीबीने सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला मंगळवारी अटक केली. याच दरम्यान एक अशी बातमी समोर आली ज्यामुळे सुशांतचे चाहते नाराज होऊ शकतात. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार सुरक्षेच्या कारणास्तव कारागृह अधिकाऱ्यांनी रिया चक्रवर्तीला वेगळ्या कोठडीत  ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रियाच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे की, यामागे काही वेगळा कारण आहे हे  हे अद्याप समजू शकलेले नाही.

सध्या रियाच्या जामीन याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी सुरु आहे रियाने 'आपण निरपराध आहोत. आपल्याला या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. यामुळे आपल्याला जामीन द्यावा,' असे रियाने आपल्या जामीन अर्जात म्हटले आहे.

कशी गेली तुरूंगात कालची रात्र रिया चक्रवर्तीची काल दुपारनंतर जेलमध्ये रवानगी करण्यात आली. मुंबईतील भायखळा जेलमध्ये रियाला वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले आहे. जेलमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रियाला रात्री जेवण दिले गेले ज्यात दोन चपाती, डाळ आणि भाजी दिली होती.

८० टक्के बॉलिवूड सेलिब्रिटीज घेतात ड्रग्स - रिया मीडिया रिपोर्टनुसार, आपल्या जामिन याचिकेदरम्यान रियाने धक्कादायक दावा केला आहे. ती यावेली म्हणाली की, ८० टक्के बॉलिवूड सेलिब्रिटीज ड्रग्स घेतात.

 

अंकिताने साधला रियावर निशाणाअंकिताने इन्स्टाग्राम लिहिले की, 'मला पुन्हा पुन्हा मीडिया विचारते की, काय वाटतं हा मर्डर आहे की सुसाइड? त्यामुळे मी हे स्पष्ट करण्यासाठी सांगते की, मी कधीच म्हणाले नाही की, हा मर्डर आहे किंवा यासाठी एखादी विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा दिवंगत मित्र सुशांत सिंह राजपूतच्या न्यायाची मागणी केली आहे. मी त्याच्या परिवारासोबत उभी आहे. आणि तपास यंत्रणेसमोर सत्य आलं पाहिजे'.

सरकारवर विश्वास अंकिताने लिहिले की, 'एक महाराष्ट्रीयन आणि भारतीय नागरीक असल्या कारणाने माझा राज्य सरकार पोलीस आणि केंद्र सरकारवर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा माझ्यासाठी 'विधवा' शब्दांचा वापर पब्लिकमध्ये झाला. मी त्यावर कधीही उत्तर दिलं नाही. मी केवळ २०१६ पर्यंत सुशांत आणि त्याच्या मेंटल हेल्थबाबत सांगायला पुढे आले'.

सुशांतच्या मेंटल हेल्थाबाबत माहीत होतं अंकिताने पुढे लिहिले की, 'डिअर हेटर्स, चला मान्य करू की, तुम्हाला तुमच्या मित्राबाबत सगळं काही नक्कीच माहीत असेल की, त्याच्या जीवनात आणि रिलेशनशिपमध्ये काय सुरू आहे. हे बघून चांगलं वाटलं की, अखेर तुम्ही झोपेतून उठलात. पण कदाचित तुम्ही आधी शुद्धीवर आले असता तर आपल्या मित्राला ड्रग्स न घेण्याचा सल्ला दिला असता. त्याना सुशांतच्या मेंटल हेल्थबाबत माहीत होतं कारण त्यांनी पब्लिकली सांगितलं होतं की, तो डिप्रेशनमध्ये होता'.

काय म्हणाली होती रिया? सुशांतला पूर्वीपासून ड्रगचे व्यसन होते, स्टाफच्या माध्यमातून तो त्याची मागणी करीत असे, आपल्या संबंधात आल्यानंतर मी त्याच्या सूचनेनुसार ती शोविक व अन्य स्टाफच्या माध्यमातून गांजा मागवित होते. त्यासाठी बासित आपल्या घरी येत असल्याची कबूली दिली आहे. केदारनाथ चित्रपटाच्या शुटिंगच्यावेळी तो सेटवर ड्रग घेत होता. आपण त्याला या व्यसनापासून दूर रहाण्यासाठी वारंवार विनंती करीत होते, तो त्यासाठी तयारही होता. मात्र, मानसिक विकारामुळे त्याला ते शक्य झाले नसल्याचे तिने म्हटले आहे. 'तो गांजा सिगारेटमध्ये घालून ओढीत असे, आपण मात्र कधीच ड्रगचे सेवन केले नसल्याचा दावा तिने केला आहे. 

सुशांतची विधवा संबोधल्यामुळे नाराज झाली अंकिता लोखंडे, सुनावले खडेबोल

 

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत