Join us

Richa Chadha Mehandi: रिचाच्या हातावर सजली अलीच्या नावाची मेहंदी, मेहंदी डिझाईन आहे फारच खास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 10:25 AM

Richa Chadha Ali Fazal Wedding : रिचा व अलीच्या प्री-वेडिंग सेरेमनीला सुरूवात झालीये. रिचाच्या हातावर अलीच्या नावाची मेहंदी सजली आहे.

 अभिनेत्री  रिचा चड्ढा (Richa Chadha  )आणि अली फजल (Ali Fazal) बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. ‘फुकरे’च्या सेटवर हे दोघे प्रेमात पडले आणि तेव्हापासून दोघंही सोबत आहे. हे कपल लग्नबंधनात अडकणार, अशी गेल्या दिवसांपासून होतेय. पण या ना त्या कारणानं लग्नाचा बेत मागे पडत राहिला. खरं तर लग्नाचा बेत कधीच ठरला होता. पण कोरोना महामारीमुळे सगळंच वेळापत्रक कोलमडलं.   लग्न लांबल्यानं या जोडप्यानं अखेर लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. पण फायनली ती वेळ आली आहे. रिचा व अलीच्या प्री-वेडिंग सेरेमनीला सुरूवात झालीये. रिचाच्या हातावर अलीच्या नावाची मेहंदी सजली आहे.

येत्या 4 तारखेला रिचा व अली यांचं लग्न होणार आहे. दिल्लीत ही वेडिंग सेरेमनी होतेय. लग्न एकदम खासगी असणार आहे. केवळ कुटुंबाचे लोक आणि जवळचे मित्रचं या लग्नात सहभागी होणार आहे.

दिल्लीत रिचा व अलीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची सुरूवात झाली आहे. रिचाने तिच्या इन्स्टास्टोरीवर मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत. रिपोर्टनुसार, रिचाच्या मेहंदीसाठी राजस्थानातून पाच आर्टिस्ट बोलवले होते.

रिचाच्या हातावर काढण्यात आलेल्या मेहंदीमध्ये अलीचं नाव आहे. तिच्या दोन लाडक्या मांजरींचे स्केच आहे. कारण तिच्याकडे दोन मांजरी आहेत. एकीचं नाव जुगनी तर दुसरीचं नाव कमली आहे. या दोन्ही मांजरींवर रिचाचं प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे या मांजरींना रिचा कशी विसरणार होती? अलीच्या नावाचं पहिलं अक्षरही तिच्या मेहंदीमध्ये आहे.

रिचा व अलीने एक व्हाईस मॅसेजही शेअर केला आहे. यात अलीचाही आवाज आहे. आम्ही दोन वर्षांआधी वेडिंग सेरेमनी प्लान केली होती. पण कोरोना महामारी व पर्सनल प्रॉब्लेम्समुळे आम्हाला हे सेलिब्रेशन पुढे ढकलावं लागलं होतं, असं दोघांनी या व्हाईस मॅसेजमध्ये म्हटलं आहे.2020 व 2021 हे वर्ष अलीसाठी चांगलं नव्हतं. 17 जून 2020 रोजी अलीच्या आईचं निधन झालं होतं. यानंतर याचवर्षी 24 एप्रिलला त्याच्या आजोबाची प्राणज्योत मालवली होती. रिचा चढ्ढा आणि अली फजल 10 वर्षांच्या दीर्घ रिलेशनशिपनंतर लग्नगाठ बांधणार आहेत.

 

असं केलं होतं प्रपोजअलीनं रिचाला कसं प्रपोज केलं होत? तर बिना अंगठीचं. होय, खुद्द अलीनं याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं. ‘मी रिचाला प्रपोज केलं. पण यासाठी मी कहीही प्लान केला नव्हता. मी तिला प्रपोज करायला गेलो तेव्हा माझ्याजवळ अंगठीही नव्हती. फक्त हीच योग्य वेळ आणि ठिकाण आहे, एवढंच मला माहित होतं,’ असं अलीनं सांगितलं होतं.रिपोर्टनुसार, रॉबर्ट डाऊनी (ज्युनिअर)चा ‘चॅप्लिन‘ हा सिनेमा पाहत असताना सर्वप्रथम रिचानं अलीला प्रपोज केलं होतं. त्यावेळी अलीनं काहीही उत्तर दिलं नव्हतं. यानंतर तीन महिन्यांनी अलीनं रिचाला प्रपोज केलं होतं.

टॅग्स :रिचा चड्डाअली फजलबॉलिवूडसेलिब्रिटी