Join us

कोरोनामुळे या प्रसिद्ध बॉलिवूड जोडप्याला पुढे ढकलावी लागली लग्नाची तारीख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 6:54 PM

बॉलिवूडमधील या प्रसिद्ध कपलचे लग्न एप्रिल महिन्यात होणार होते.

ठळक मुद्देअली फजल आणि रिचा चड्ढा एप्रिल महिन्यात लग्नबेडीत अडकणार होते. ते एप्रिल महिन्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार होते. पण आता कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले आहे.

कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे. या दरम्यान होणारे सगळे लग्न समारंभ देखील पुढे ढकलण्यात आले आहेत. केवळ सामान्य लोकांनीच नव्हे तर सेलिब्रेटींनी देखील आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे.

अली फजल आणि रिचा चड्ढा एप्रिल महिन्यात लग्नबेडीत अडकणार होते. ते एप्रिल महिन्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार होते. पण आता कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले आहे. अलीनेच एका मुलाखती दरम्यान या गोष्टीचा खुलासा केला आहे. अलीने सांगितले आहे की, आम्ही लग्नासाठी हॉल बुक केला नव्हता की निमंत्रण पत्रिका छापल्या नव्हत्या. त्यामुळे आमचे पैसे काही वाया गेले नाहीत. मी कामात व्यग्र असल्याने लग्नाच्या तयारीसाठी वेळ काढू शकत नव्हतो. त्यामुळे मला माझ्या घरातल्यांचे बोलणे देखील ऐकावे लागले होते.

अलीने या मुलाखतीत सध्याच्या स्थितीविषयी देखील भाष्य केले आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहाता काय सुरू आहे हेच कळत नाहीये असे त्याने म्हटले आहे. 

फुकरे आणि फुकरे रिटर्न्समध्ये अली फजल आणि रिचा चड्ढा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. हे खऱ्या आयुष्यातही ते दोघे रिलेशनशीपमध्ये असून त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. त्या दोघांना अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहाण्यात येते. तसेच ते दोघे नेहमीच त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलेपणाने बोलताना दिसतात. सोशल मीडियावर देखील ते नेहमीच एकत्र फोटो पोस्ट करतात. 

टॅग्स :अली फजलरिचा चड्डा