Join us

रिचा चड्ढाने डिलीट केले महिला आयोगाबाबतचे 'ते' ट्विट, जाणून घ्या कारण...

By अमित इंगोले | Published: October 12, 2020 1:45 PM

रिचाने एक दिवसाआधी ट्विट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना विचारले होते की, तिने पायल विरोधात केलेल्या तक्रारीचे काय झाले. आता रिचाने हे ट्विट डिलीट केले आहे.

दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा लावणाऱ्या पायल घोषने रिचा चड्ढाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर रिचा चड्ढाने पायलवर केवळ मानहानीचाच दावा ठोकला नाही तर महिला आयोगाकडेही तक्रार केली होती. दरम्यान रिचाने एक दिवसाआधी ट्विट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना विचारले होते की, तिने पायल विरोधात केलेल्या तक्रारीचे काय झाले. आता रिचाने हे ट्विट डिलीट केले आहे.

रिचाने चड्ढाने तक्रारी संदर्भात महिला आयोगाला एक मेल केला होता. रिचाने ट्विट करत याबाबत माहिती दिली की, 'आधीचे ट्विट डिलीट केले आहेत. कारण NCW म्हणजेच राष्ट्रीय महिला आयोगाकडून उत्तर मिळालं आहे. धन्यवाद'. रिचाने यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना धन्यवाद देत लिहिले की, 'तुम्ही दिलेल्या उत्तरासाठी धन्यवाद रेखा शर्मा मॅम. आधीचं ट्विट डिलीट केलं आहे. ज्यात मी माहिती मागत होते. तुमचा मेल एका वेगळ्या आयडीवरून आला होता. जो चुकून स्पॅममध्ये गेला होता'. (पायल घोष केसवरून रिचा चड्ढाला तापसी पन्नूने दिला मोलाचा सल्ला, म्हणाली....)

रिचा चड्ढाने ट्विट करत पायल घोष विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती. पण त्या तक्रारीवरून रिचाला महिला आयोगाकडून काहीच उत्तर मिळालं नव्हतं. पायल घोष म्हणाली होती की, अनुराग कश्यपने कथितपणे सांगितले होते की, रिचा चड्ढा, माही गिल आणि हुमा कुरेशी त्याला सेक्शुअल फेव्हर देतात'. ( रिचा चड्ढाचा महिला आयोगाला प्रश्न, माझ्या तक्रारीचं काय झालं?, पायल म्हणाली - माफी नाही मागत...)

या प्रकरणातील मानहानीच्या केसमध्ये पायल घोषचे वकिल म्हणाले होते की, ती तिचं वक्तव्य मागे घेण्यास तयार आहे. पण पायलने नंतर ट्विट करत सांगितले होते की, ती कुणाचीही माफी मागणार नाही. तिने काहीही चूक केलेलं नाही. ती तेच बोलली जे तिला अनुराग कश्यपने सांगितलं होतं.

काय म्हणाली होती पायल घोष

अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. एका मुलाखतीत पायलने अनुराग कश्यपने तिच्यासोबत काय काय केले, ते सविस्तर सांगितले होते. तिने सांगितले की, ‘अनुरागने मला घरी बोलावले होते. तो स्मोकिंग करत होता. काही वेळानंतर त्याने मला दुस-या खोलीत नेले.  त्यानंतर त्याने मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक तो माझ्यासमोर न्यूड झाला आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्याला  मला कन्फर्टेबल वाटत नाही, असे म्हणाले. यावर मी ज्या अभिनेत्रींसह काम केले आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे अनुराग मला म्हणाला.  मी  तिथून कसेबसे पळाले. त्यानंतर मी त्याला कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावलं. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो.

टॅग्स :रिचा चड्डापायल घोषबॉलिवूडलैंगिक छळ