Join us

पुरूषांच्या चुकांसाठी महिलांना दोष देणे कधी थांबवणार? शिल्पाला रिचा चड्ढाची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 11:17 IST

Raj Kundra Pornography Case : हंसल मेहतानंतर आता अभिनेत्री रिचाने सुद्धा शिल्पा शेट्टीला पाठिंबा दिलाय.

ठळक मुद्देपोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी शिल्पाला क्लिनचीट दिलेली नाही. अर्थात अद्याप पतीसोबत ती सुद्धा या प्रकरणात सामील होती याचे कोणतेही पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत.  

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी  (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा  (Raj Kundra) याला पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case) अटक झाल्यानंतर बॉलिवूडचे वातावरण ढवळून निघाले आहे. शिल्पाही संशयाच्या भोव-यात सापडली आहे. सोशल मीडियावर शिल्पा जबरदस्त ट्रोल होतेय. शिल्पाचे इंडस्ट्रीत बरेच मित्र आहे. पण या प्रकरणानंतर सर्वांनी चुप्पी साधली आहे. काल दिग्दर्शक हंसल मेहता शिल्पाच्या बाजूने मैदानात उतरले होते. ‘आनंदाच्या सोहळ्यात सेलिब्रिटी मित्रांचा गोतावळा जमतो. दु:खात मात्र एकही समोर येत नाही,’ अशा शब्दांत त्यांनी मूग गिळून गप्प बसलेल्या सेलिब्रिटींना सुनावले होते. आता आणखी एक अभिनेत्री शिल्पाच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. तिचे नाव रिचा चड्ढा (Richa Chadha).   हंसल मेहतानंतर आता अभिनेत्री रिचाने सुद्धा शिल्पा शेट्टीला पाठिंबा दिलाय.

ट्विटर अकाउंटवरवरून ट्विट शेअर करत तिने शिल्पाला पाठींबा दिला. ‘पुरूषाची चूक असली तरी त्याच्या चुकीसाठी त्याच्या आयुष्यात असलेल्या महिलेला दोषी ठरवले जाते. हा जणू आपला राष्ट्रीय खेळ बनला आहे,’ असे ट्विट तिने केले. रिचा ही बॉलिवूडची परखड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तूर्तास तिच्या या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.शिल्पा शेट्टीबद्दल सांगायचे तर पती राज कुंद्रा याला १९ जुलै रोजी अटक केल्यानंतर शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबियांची मानहानी करणारे अनेक लेख प्रसिद्ध करण्यात आले होते. यानंतर संबंधित मीडिया हाऊसच्याविरोधात तिने मानहानी दावा केला होता. प्रसारमाध्यमांना कोणत्याही प्रकारचा बदनामीकारक, अयोग्य वार्तांकन करण्यापासून प्रतिबंध करावा, अशी अंतरिम मागणी शिल्पाने दाव्यात केली होती. तूर्तास पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी शिल्पाला क्लिनचीट दिलेली नाही. अर्थात अद्याप पतीसोबत ती सुद्धा या प्रकरणात सामील होती याचे कोणतेही पुरावे पोलिसांना मिळालेले नाहीत. 

टॅग्स :रिचा चड्डाशिल्पा शेट्टीराज कुंद्रा