बॉलिवूड इंडस्ट्रीने अनेक सामान्य लोकांना स्टार केलं आहे. त्यामुळे या क्षेत्रात पाय ठेवलेल्या अनेकांचं नशीब चांगलंच उजळलं आहे. यात अगदी कलाकारांपासून दिग्दर्शक-निर्मात्यांपर्यंत अनेकांचा समावेश होतो. कोणताही सिनेमा रिलीज झाला की त्याचा सगळ्यात जास्त फायदा एका निर्मात्याला होत असतो. कारण, कोणताही सिनेमा सुपरहिट झाला तर निर्मात्यांना कोटयवधींचा फायदा होतो. यात सध्या अशा निर्मात्याची चर्चा रंगली आहे जो बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत निर्माता म्हणून ओळखला जातो. परंतु, एक काळ असा होता जेव्हा त्याने चक्क टुथब्रश विकले होते. इतकंच नाही तर त्याने केबल टीव्ही नेटवर्कचाही व्यवसाय केला होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता कोण म्हटलं तर पटकन आदित्य चोप्रा किंवा भूषण कुमार यांचं नाव येतं. परंतु, या दोघांपेक्षाही कमाईच्या बाबतीत एक निर्माता चांगलाच अग्रेसर आहे. तो निर्माता म्हणजे रॉनी स्क्रूवाला (Ronnie screwvala). सुरुवातीला टुथब्रश विकणारा हा मुलगा आज १२ हजार ८०० कोटींचा मालक आहे.
रॉनी यांनी सीए व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. परंतु, रॉनी यांच्या डोक्यात काही वेगळेच विचार होते. सुरुवातीला त्यांनी टूथब्रश तयार करणारी कंपनी सुरु करावी असं ठरवलं. त्यासाठी त्यांनी इंग्लंडवरुन २ टूथब्रश तयार करणारी एक मशीन आणली. त्यांच्या या ब्रँडचं नाव त्यांनी लेजर असं ठेवलं. विशेष म्हणजे पाहता पाहता या कंपनीचा विस्तार वाढला आणि देशातील सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या टूथब्रश कंपनीच्या यादीत त्यांचा समावेश झाला.
RSVP फिल्मचा सर्वेसर्वा आणि UTV मोशन पिक्चर्सचा माजी प्रमुख रॉनी स्कूवाला आज बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत निर्माता म्हणून ओळखला जातो. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, रॉनी स्क्रूवालाची एकून संपत्ती १२ हजार ८०० म्हणजेच १.५ बिलियन डॉलर इतकी आहे.