Join us

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबाची अशी झाली होती अवस्था; लेक रिद्धिमा म्हणते, "त्यांना गमावल्याचं दु:ख..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:47 PM

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता.

Riddhima Kapoor : अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor)  यांनी एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य गाजविले होते. ३० एप्रिल २०२० या दिवशी ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. त्याआधी २ वर्ष अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर २०१९ मध्ये ते भारतात परतले. त्यानंतर मार्चमध्ये त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचे ३० एप्रिल २०२० मध्ये त्याचं निधन झालं. ऋषी कपूर त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जायचे. दरम्यान, कोरोनाकाळात लॉकडाऊन असल्यामुळे रिद्धिमा कपूर(Riddhima Kapoor) तिच्या सासरी दिल्लीत अडकली होती. त्यामुळे रिद्धिमा वडिलांचे अंतिम दर्शनही घेऊ शकली नव्हती. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. अशातच त्यांची लेक रिद्धिमाने त्यावेळची परिस्थिती सांगितली आहे. 

नुकतीच रिद्धिमाने सिद्धार्थ कननच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यादरम्यान, तिने वडील ऋषी कपूर यांच्या निधनानंतर घरच्यांची कशी अवस्था झाली होती, याविषयी सांगितलं आहे. त्यावेळी रिद्धिमा म्हणाली, "ज्यावेळी माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा घरातील प्रत्येकाने आपल्या भावनांना आवर घातला होता. आम्ही सगळेच आपापल्या खोलीत जाऊन रडायचो. परत बाहेर आल्यानंतर सर्वांसोबत नॉर्मल वागायचो पण कुणीही मनातील दु:ख व्यक्त करत नव्हतं. परंतु त्यामुळे आम्ही एकमेकांच्या आणखी जवळ आलो". 

पुढे रिद्धिमा म्हणाली, "ऋषी कपूर गेल्यानंतर कुटुंबातील कोणताही सदस्य आपल्या मनातील भावना एकमेकांसमोर व्यक्त करत नव्हतं. त्यांना गमावल्याचं दु:ख प्रत्येकाला होतं. त्यानंतर मी आणि आईने एकमेकींना धीर देण्याचा प्रयत्न केला".

टॅग्स :रिद्धिमा कपूरऋषी कपूरबॉलिवूडसेलिब्रिटी