Join us

रिमा लागू यांना सेलिब्रिटींनी दिली टिवटरवरून श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 9:28 AM

ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. बुधवारी मध्यरात्रीनंतर छातीत दुखत ...

ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ५९ वर्षांच्या होत्या. बुधवारी मध्यरात्रीनंतर छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री एकच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ‘बी टाऊन’ चे सेलिब्रिटी आणि टीव्ही जगतातील कलाकार यांनी टिवटरवर त्यांना श्रद्धांजली दिली. करण जोहरही खरंच खुप दु:खदायक बातमी आहे. एक कलाकार म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व फार वेगळे होते. त्यांच्यासाठी दिग्दर्शन करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.                                      प्रियांका चोप्रात्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या जाण्याने इंडस्ट्रीची खुप मोठी हानी झाली आहे. त्या नेहमीच बॉलिवूडच्या एक चांगल्या आई राहतील.                                    अनुष्का शर्माप्रेमळ आणि प्रगल्भ असलेलं त्यांचं व्यक्तिमत्त्व नेहमीच सर्वांना आवडत होतं. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या सर्वांना धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबियांचे मी सांत्वन करते.                                        अक्षय कुमारएक चांगली कलाकार आणि माणूसही. त्यांच्यासोबत मला काम करायला मिळाले हे माझे भाग्य. तुमच्या आत्म्याला शांती मिळो.                                         ऋषी कपूरतुमच्या आत्म्याला शांती मिळो. काही चित्रपटांत त्यांच्यासोबत काम करता आले. एक चांगल्या कलाकार होत्या.                                             श्रिया पिळगांवकररिना मावशी आज सकाळी गेली. त्यांच्या जाण्याने खुप मोठी हानी झाली आहे. खुप आठवण होत आहे तुझी.                                             रागिनी खन्नातुमच्या आत्म्याला शांती लाभो. तुमची खुप आठवण येणार.                                              रितेश देशमुखखुपच दु:खदायक आणि धक्कादायक बातमी आहे. आम्हाला तुमची खुप आठवण येईल. तुमच्या जाण्याने खुप मोठी हानी झाली आहे.                                         फराह खान रिमा लागू गेल्या हे कळताच खुप धक्का बसला. खुप गाण्यांमध्ये तिच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.