यावर्षी 9 फेब्रुवारीला राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांचे निधन झाले. राजीव कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीवर त्यांचे बंधू रणधीर कपूर (Randhir Kapoor) आणि बहिण रीमा जैन (Rima Jain) यांनी हक्क सांगितला आहे. विशेष म्हणजे, यासाठी या दोघांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.सोमवारी दिवंगत राजीव कपूर यांच्या मालमत्तेवरील हक्कासाठी रणधीर व रीमा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या़ गौतम पटेल यांनी संबंधित याचिकेवर सुनावणीही केली. यादरम्यान राजीव कपूर यांच्या मालमत्तेवर फक्त भाऊ-बहीणच हक्क दाखवू शकतात, असा युक्तिवाद रणधीर व रीमा जैन यांच्या वकीलांनी केला. (rima jain and randhir kapoor wants right on rajiv kapoor property).
यावर न्यायालयाने राजीव यांच्या घटस्फोटाची कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिलेत. मात्र राजीव यांच्या घटस्फोटाची कागदपत्रे आमच्याकडे नसून आम्ही ती शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती सापडली नाही. त्यामुळे घटस्फोटाची कागदपत्रे सादर करण्यापासून सूट देण्यात यावी, अशी विनंती वकीलांनी केली. यावर न्या़ गौतम यांनी घटस्फोटाच्या आदेशाची कागदपत्रे सादर न करण्यासाठी सूट देण्याची तयारी दर्शवली. परंतु स्वीकृतीपत्र आधी दिले जावे, असे न्यायाधीश गौतम म्हणाले. या प्रकरणातील सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.
राजीव कपूर यांचा लग्नानंतर दोन वर्षांनीच झाला होता घटस्फोट
राजीव कपूर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना फारशी माहिती नाही. राज कपूर यांचा सर्वात लहान मुलगा असलेल्या राजीव यांनी 2001 मध्ये आरती सभरवालसोबत लग्न केले होते. आरती सबरवाल एक आर्किटेक्ट आहे. राज कपूर यांचा या लग्नाला विरोध होता. पण तरीही राजीव यांनी आरती यांच्याशी लग्न केले. अर्थात हे लग्न फार काळ टिकले नाही. दोन वर्षातच दोघांचाही घटस्फोट झाला. आरती सध्या कॅनडामध्ये राहतात, असे कळते. घटस्फोटानंतर राजीव यांनी दुसरे लग्न केले नाही. ते एकटेच राहत.