बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन (Rimi Sen) मध्य प्रदेशातील उज्जैन येथे बाबा महाकालचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. जिथे ती शिवभक्तीत तल्लीन झालेली दिसली. रिमी सेनचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ती महाकालच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसली. फोटोमध्ये अभिनेत्री नंदी हॉलमध्ये बसून शिव ध्यानात मग्न दिसत होती. तिने कपाळावर टिळक लावलेले दिसले. यासोबतच तिने 'महाकाल' नावाची लाल रंगाचा शॉल परिधान केलेली दिसते आहे.
अभिनेत्री रिमी सेन सोशल मीडियावर सक्रिय असते आणि अनेकदा चाहत्यांसह अनेक पोस्ट शेअर करते. महाकाल मंदिरातील दर्शन आणि पूजेचा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आज उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शन घेतले. फोटोमध्ये अभिनेत्री मंदिरातील पुजारी आणि लोकांना भेटताना आणि प्रसाद घेताना दिसत आहे. एएनआयशी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, मी या ठिकाणाबद्दल खूप ऐकले आहे, मी येथे पहिल्यांदाच आले आहे. मी या संस्थेचे आभार मानू इच्छिते ज्यांनी इथे इतकी चांगली व्यवस्था केली आहे, गर्दी नाही, सर्व काही शांततेत झाले."
प्लास्टिक सर्जरीच्या अफवेवर सोडलं मौनसुंदर आणि स्टायलिश अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत असते. रिमी सेनने 'धूम', 'गरम मसाला', 'गोलमाल', 'बागबान', 'दिवाने हुए पागल', 'फिर हेरा फेरी' आणि 'जॉनी गद्दार', 'दे ताली', 'संकट सिटी', 'हॉर्न ओके', 'प्लीज', 'थँक यू' आणि 'शागिर्द' यासारख्या यशस्वी चित्रपटात काम केले आहे. अभिनेत्रीने नुकतेच प्लास्टिक सर्जरी झाल्याच्या अफवेवर मौन सोडले आणि चाहत्यांना माहिती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की तिने फिलर्स, बोटॉक्स आणि पीआरपी उपचार घेतले आहेत. रिमी सेनने २०१६ मध्ये 'बुधिया सिंग- बॉर्न टू रन' या बायोपिकची निर्मिती केली होती. या चित्रपटाला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले.