Join us  

प्लास्टिक सर्जरीवरुन ट्रोल झाल्यानंतर रिमी सेनने दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, 'बोटॉक्स, फिलर्स...'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 4:21 PM

रिमीने प्लास्टिक सर्जरी केल्याच्या चर्चा झाल्या. या चर्चांवर रिमीने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

अभिनेत्री रिमी सेन (Rimi Sen) 'हंगामा', 'क्योंकी', 'हेरा फेरी', 'गोलमाल' या सिनेमांमुळे प्रसिद्ध आहे. काही सिनेमांमध्ये काम केल्यानंतर रिमी अचानक स्क्रीनवरुन गायब झाली. ११ वर्षांपासून ती सिनेमांमध्ये दिसलेली नाही. काही दिवसांपूर्वीच रिमी सेनचा एक फोटो व्हायरल झाला. यात तिला ओळखणंही कठीण झालं होतं. रिमीने प्लास्टिक सर्जरी केल्याच्या चर्चा झाल्या. या चर्चांवर रिमीने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

सोशल मीडियावरुन प्रचंड ट्रोल झाल्यानंतर आता रिमी सेन भडकली आहे. हिंदुस्तान टाईम्सला प्रतिक्रिया देताना ती म्हणाली, "जर लोकांना वाटत असेल की मी प्लास्टिक सर्जरी केली आहे...आणि जर ते चांगल्या पद्धतीने बोलत असतील तर माझ्यासाठी बरंच आहे. कारण प्लास्टिक सर्जरी केली नसतानाही लोक असं म्हणत आहेत. मी केवळ फीलर्स, बोटॉक्सस पीआरपी ट्रीटमेंट केली आहे. याशिवाय काहीच नाही."

ती पुढे म्हणाली, "जोपर्यंत एखादा व्यक्ती काही गुन्हा करुन पळून जात नाही तोपर्यंत त्याला प्लास्टिक सर्जरीची गरज लागत नाही. भारताबाहेर खूप चांगले डॉक्टर्स आहेत जे फेसलिफ्ट करण्यात तरबेज आहेत. मलाही हे करायचं आहे पण वयाच्या ५० व्या वर्षानंतर मी याचा विचार करेन. सध्या फीलर्स, बोटॉक्सने काम होत आहे."

सध्या माझे दोन डॉक्टर आहेत ज्यांच्याकडून मी सल्ला घेते आणि ट्रीटमेंट घेते. ते मला चांगलं दिसण्यासाठी मदत करतात. कदाचित लोकांना माझ्या लेटेस्ट फोटोंमध्ये माझी त्वचा आवडली. या गोष्टी केल्यानंतर आणि नियंत्रणात ठेवल्यानंतर कोणीही चांगलं दिसू शकतं. जर तुम्ही माझ्यातील दिसणाऱ्या बदलाला चुकीचं बोलत असाल तर मी ही चूक कशी सुधारु मला सांगा. जेणेकरुन मला डॉक्टरांनाही याची कल्पना देता येईल. हे ठीक करा असं मला त्यांना सांगता येईल."

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाट्रोलसोशल मीडिया