हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते रियो कपाडिया (Rio Kapadia) यांचं निधन झालं आहे. त्यांचं वय ६६ वर्ष होतं. निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आपल्या अभिनयाने सर्वांचं मन जिंकणारे रियो यांनी 'दिल चाहता है', 'हॅपी न्यू इयर'सह अनेक सिनेमात काम केलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मारिया आणि अमन, वीर ही दोन मुलं आहेत. त्यांच्या पार्थिवावर उद्या गोरेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
रियो कपाडिया यांचे मित्र फैजल मलिक यांनी माहिती देताना सांगितले, "मित्रहो, सांगताना अतीव दु:ख होत आहे रियो कपाडिया आपल्यात राहिले नाहीत. १४ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. कुटुंबाकडून नंतर बाकी माहिती दिली जाईल."
रियो कपाडिया यांनी २०२१ साली आलेल्या अभिषेक बच्चनच्या 'द बिग बुल' सिनेमातही भूमिका साकारली. तर नुकत्याच रिलीज झालेल्या 'मेड इन हेव्हन 2'मध्येही ते दिसले. रियो तब्येतीची काळजी घ्यायचे तसंत डाएटही फॉलो करायचे. अनेकदा ते कुटुंबासोबत व्हॅकेशनवर जायचे. २०१३ साली आलेल्या 'महाभारत' या मालिकेत ते पांडूच्या भूमिकेत दिसले. त्यांना 'सपने सुहाने लडकपन के' ओळख दिली. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टी हळहळली आहे.