Urvashi Rautela Rishabh Pant: उर्वशी रौतेलाच्या आईने केली रिषभ पंतसाठी विशेष पोस्ट, Photo देखील केला शेअर, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 09:35 PM2023-01-02T21:35:33+5:302023-01-02T21:37:02+5:30

रिषभ पंतचा शुक्रवारी सकाळी झाला मोठा अपघात

Rishabh Pant Accident Urvashi Rautela mother Meera Rautela shares emotional Post wishes for speedy recovery | Urvashi Rautela Rishabh Pant: उर्वशी रौतेलाच्या आईने केली रिषभ पंतसाठी विशेष पोस्ट, Photo देखील केला शेअर, चर्चांना उधाण

Urvashi Rautela Rishabh Pant: उर्वशी रौतेलाच्या आईने केली रिषभ पंतसाठी विशेष पोस्ट, Photo देखील केला शेअर, चर्चांना उधाण

googlenewsNext

Urvashi Rautela mother Post about Rishabh Pant: भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला शुक्रवारी पहाटे अपघात झाला. रस्ते अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याला आयसीयूमधून खासगी वॉर्डात हलवण्यात आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. क्रिकेटपासून ते बॉलीवूड आणि राजकीय जगतातील सेलिब्रिटींनीही तो लवकरात लवकर तंदुरूस्त व्हावा, यासाठी सदिच्छा आणि प्रार्थना केल्या आहेत. रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्याबद्दल अनेक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. याच दरम्यान, उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेला यांना रिषभ पंतबद्दल इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाची आई सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रिषभ पंतच्या अपघाताची बातमी समजल्यानंतर मीरा रौतेला यांनी यष्टीरक्षक-फलंदाजाचा फोटो शेअर केला. त्यांच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, "एकीकडे सोशल मीडियावर अफवांची मालिका सुरू आहे, पण दुसरीकडे तुझ्या प्रकृतीत सुधारणा होणं ही खूप चांगली गोष्ट आहे. तू लवकरात लवकर बरा हो आणि उत्तराखंडचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल करण्यासाठी लवकर मैदानात उतर. सिद्धबलीबाबा तुझ्यावर विशेष कृपादृष्टी ठेवोत. तुम्ही सर्वांनीही प्रार्थना करा."

रिषभ पंतसाठी उर्वशी रौतेलाच्या आईने केलेल्या पोस्टवर काही यूजर्सने कमेंट केल्या. काही युजर्सने लिहिले की 'जावईबापू लवकर बरे होतील, काळजी करू नका.' दुसर्‍या युजरने लिहिले की, 'उर्वशीच्या आईचा आदर ठेवा.' तर आणखी एका युजरने लिहिले की, 'सासूच्या प्रार्थना नेहमीच कामी येतात.'

दरम्यान, अभिनेत्री उर्वशी रौतेला अनेकदा तिच्या पोस्टमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. अनेक दिवसांपासून पंतवरून तिला ट्रोल केले जात आहे. ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ती पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. त्याच्या कॅप्शनमध्ये उर्वशीने लिहिले- 'मी प्रार्थना करत आहे.' यावरून यूजर्सने तिला ट्रोल केले. यानंतरही उर्वशी रौतेलाच्या काही ट्विट्स किंवा पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र आता तिच्या आईची पोस्ट चर्चेत आहे.

Web Title: Rishabh Pant Accident Urvashi Rautela mother Meera Rautela shares emotional Post wishes for speedy recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.