बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून ते कॅन्सरशी झुंज देते होते. ऋषी कपूर यांची पत्नी नीतू सिंग त्यांच्यासोबत ११ महिने त्यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये होत्या. कॅन्सरशी झुंज देताना नीतू सिंग प्रत्येक क्षण त्यांच्यासोबत होत्या.
सप्टेंबर २०१९मध्ये ज्यावेळी ते मायदेशी परतले होते. त्यावेळी मायदेशी परतल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. ऋषी व नीतू सिंग दोघेही मुंबई एअरपोर्टवर उतरताच मीडियाचे कॅमेरे त्यांच्यावर रोखले गेले होते. त्यावेळी ऋषी कपूर यांच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता.
न्यूयॉर्कमध्ये असताना बराच काल आपल्या घरापासून दूर असलेल्या ऋषी कपूर यांनी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या भावनांना वाट करुन दिली होती. याकाळात घरच्या आठवणीने ते अनेकदा हळवे झालेले दिसले.