काल अभिनेता इरफान खान चाहत्यांना सोडून गेला आणि आज बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतली. बुधवरी रात्री त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ऋषी कपूर ६७ वर्षांचे होते गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी लढत होते.
अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर ‘१०२ नॉट आऊट’ सिनेमात शेवटचे एकत्र दिसले होते. या चित्रपटात ऋषी कपूर ७५ वर्षांच्या अक्का बाबुलाल या वृद्धाची भूमिका साकारली होती. तर अमिताभ बच्चन हे अक्का बाबुलालच्या १०२ वर्षांच्या पित्याची भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होती.
2018 मध्ये ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. तेथे 11 महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते.ऋषी कपूर यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पहिलाच सिनेमा ‘बॉबी’ सुपरडुपर हिट झाला आणि त्यानंतर अनेक वर्षे ऋषी कपूर यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.