बॉलिवूडमध्ये असे बरेच कपल्स आहेत, ज्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. अमिताभ बच्चन-जया बच्चन, दिलीप-सायरा बानो, धर्मेंद्र-हेमा मालिनी आणि ऋषी कपूर-नीतू कपूर यांच्यासह अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांची प्रेमकहाणी लग्नापर्यंत आणि लग्नानंतरही लोकांना ऐकायला आवडते. २३ जानेवारी, १९८० रोजी ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि नीतू कपूर(Neetu Kapoor) यांचा विवाह झाला. दरम्यान, आता ४३ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. बॉलिवूडमध्ये चिंटू जी या नावाने ओळखले जाणारे अभिनेते ऋषी कपूर आता आपल्यात नाहीत, पण तरीही त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ऋषी कपूर आणि नीतू यांच्या लग्नानंतर ज्येष्ठ अभिनेते-चित्रपट दिग्दर्शक राज कपूर यांनी आरके स्टुडिओमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी एक अप्रतिम कार्ड छापण्यात आले होते, जे ४३ वर्षांनंतर पुन्हा व्हायरल होत आहे.
आरके स्टुडिओमध्ये जमली होती महफिलनीतू आणि ऋषी कपूर यांच्या लव्हस्टोरीबद्दल लोकांना माहिती आहे. २३ जानेवारी, १९८० रोजी दोघांचे लग्न झाले. व्हायरल होत असलेले कार्ड या दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन कार्ड आहे. व्हायरल होत असलेल्या कार्डनुसार, दोघांचे रिसेप्शन स्थळ आरके स्टुडिओमध्ये होते. लग्नानंतर झालेल्या या रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
हे लग्नाचे रिसेप्शन कार्ड आहे खासलग्नाच्या रिसेप्शनला आमंत्रित करण्यासाठी छापलेले हे कार्ड सामान्य आहे, परंतु त्यावर लिहिलेली नावे अगदी खास आहेत. पत्रिकेच्या शीर्षस्थानी आर.के. स्टुडिओच्या आयकॉन्स आणि निमंत्रितांमध्ये पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, प्रेमनाथ आणि रणधीर कपूर यांसारखी नावे आहेत. वास्तविक, हा तो काळ होता जेव्हा कपूर कुटुंबाचा भारतीय चित्रपटसृष्टीत मोठा प्रभाव होता आणि प्रत्येकाला या खास कार्यक्रमाचा भाग व्हायचे होते.