Join us

अखेर ऋषी कपूर यांची बनारसला जाण्याची इच्छा राहिली अपूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 12:40 PM

ऋषी कपूर यांची बनारसला जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यांना बनारसला जायचे होते आणि त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. ते मुल्क चित्रपटासाठी वाराणसीला गेले होते. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले होते की, मला काशीला जायला मिळाले, यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो की मला काशीला जाण्याची संधी मिळाली. मी या शहराबद्दल बऱ्याच कथा ऐकल्या आहेत. शूटिंग तर झाले पण ऋषी कपूर यांना काशीला जाता आले नाही. बनारसला जाण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली आहे.

ऑगस्ट 2018 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट मुल्कमध्ये ऋषी कपूर यांनी बनारसमध्ये राहणाऱ्या मुराद अली मोहम्मद यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं शूटिंग वाराणसी व लखनऊमध्ये झाली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर काशीमधील कलाकारदेखील दुःखी झाले आहेत.

मंगळवारी तब्येत बिघडल्यामुळे ऋषी कपूर यांना मुंबईतील एचएन रिलांयस फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यावेळी रणधीर कपूर यांनी सांगितले होते की, ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणि कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यातही ऋषी कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या शूटिंगवेळी रणबीर कपूर जेव्हा 2019मध्ये बनारसला आला होता. त्यावेळी त्याने व्हिडिओ कॉल करून काशी विश्वधाम ऋषी कपूर यांना दाखविले होते. यासोबतच त्याने गंगा घाट व आरतीचे दर्शन करून दिले होते.

 

 

टॅग्स :ऋषी कपूररणबीर कपूर